Maharashtra Superfast News : 13 December 2024 : सुपरफास्ट बातम्या : ABP Majha
महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार उद्या होणार, सूत्रांची माहिती, राजभवनात शपथविधीच्या तयारीला सुरुवात, उद्या सकाळी ११ वा. किंवा दुपारी ४ वाजता नवे मंत्री घेणार शपथ.
शिवसेनेचे खातेवाटप पूर्ण, शिवसेनेला नगरविकास खाते मिळणार, तर पर्यावरण ऐवजी पर्यटन खाते मिळण्याची शक्यता, सूत्रांची माहिती,
शिवसेनेच्या मंत्र्यांची यादी तयार, तानाजी सावंत, संजय राठोड, दीपक केसरकर, अब्दुल सत्तार यांचा पत्ता कट होणार, ९ कॅबिनेट आणि ३ राज्यमंत्री उद्या शपथ घेण्याची शक्यता, सूत्रांची माहिती.
नाना पटोलेंना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नको असल्याची सूत्रांची माहिती, काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदावरून मुक्त करण्याबाबत पटोलेंचं खरगेंना पत्र, विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर नाना पटोलेंनी घेतली भूमिका.
विधानसभेतील गटनेता निवडीसाठी 17 डिसेंबरला काँग्रेसची बैठक, काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथलांच्या उपस्थितीत नागपूरमध्ये आमदारांच्या बैठकीचं आयोजन, नाना पटोले, विजय वडेट्टीवार यांचं नाव आघाडीवर.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याची भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा, दिल्लीत गौतम अदानींच्या घरी दोन्ही नेत्यांची भेट,माझाला सूत्रांची माहिती.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीत सध्या दोन मतप्रवाह, भाजपसह सत्तेत जावं अशी एका गटाची मागणी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीसह सत्तेत जावं अशी दुसऱ्या गटाची मागणी असल्याची सूत्रांची एबीपी माझाला माहिती.
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यावं, रोहित पवारांच्या मातोश्री सुनंदा पवार यांचं मोठं वक्तव्य, तर दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यावं, असं कार्यकर्त्यांनाही वाटतं, त्यामुळे कार्यकर्त्यांच्या मताचा आदर केला पाहिजे, सुनंदा पवार यांचं वक्तव्य.
राज्यात स्वस्त धान्य दुकानावर धान्य वाटप ठप्प, ४ दिवसांपासून इ-पॉस मशीन बंद, मशीन बंद असल्यानं नागरिकांना स्वस्त धान्य मिळत नसल्यानं वाद.
अपघातात जखमी झालेल्यांसाठी 'कॅशलेस उपचार योजना' लवकरच सुरु होणार, या योजनेमुळे रस्ते अपघातात जखमी झालेल्यांना दीड लाख रुपयांपर्यंतचे उपचार कॅशलेस पद्धतीने मिळू शकणार, लोकसभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची माहिती.