गुरुद्वारामध्ये गायनाला सुरुवात, आठव्या वर्षी सोडलं घर, कोट्यवधींचा मालक असलेल्या 'या' गायकाला ओळखलं का?
Diljit Dosanjh Net Worth : पंजाबमधील एका छोट्याशा गावातून आंतरराष्ट्रीत स्तरावर प्रसिद्धी मिळवण्यापर्यंतच्या दिलजीत दोसांझ याचा प्रवास फार प्रेरणादायी आहे.
Diljit Dosanjh Birthday : प्रसिद्ध पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझ फक्त भारतातच नाही, तर परदेशातही मोठा चाहतावर्ग आहे. त्याच्या आवाजाने त्याने कोट्यवधी चाहत्यांच्या मनात स्थान मिळवलं आहे. देशविदेशातील चाहते त्याच्या गाण्यांवर थिरकताना दिसतात. पंजाबमधील एका छोट्याशा गावातून आंतरराष्ट्रीत स्तरावर प्रसिद्धी मिळवण्यापर्यंतच्या त्याचा हा प्रवास फार प्रेरणादायी आहे. आज दिलजीत चित्रपट आणि कॉन्सर्टमधून मोठी रक्कम कमावतो, तो कोट्यवधींचा मालक आहे.
कोट्यवधींचा मालक असलेल्या 'या' गायकाला ओळखलं का?
दिलजीत दोसांझ याची 2024 मधील दिल-लुमिनाटी टूर खूपच चर्चेत होती. 2004 मध्ये दिलजीतने 'इश्क दा उड़ा आड़ा' या अल्बमने कारकिर्दीला सुरुवात केली. 20 वर्षांच्या करियरमध्ये त्याने अनेक हिट गाणी आणि चित्रपट दिले आहे. त्याने मनमोहक आवाजाने चाहत्यांना भूरळ घातली आहे. आज त्याच्या कॉन्सर्टची तिकीटे विकत घेण्यासाठी लाखोंच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळतात. इतकंच नाही तर त्याने दमदार अभिनयाच्या जोरावरही मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे.
आठव्या वर्षी सोडलं घर
दिलजीत दोसांझचा जन्म 1984 मध्ये पंजाबमधील जालंधर जिल्ह्यातील दोसांझ कलान गावात झाला आणि त्याला लहानपणापासूनच गाण्याची खूप आवड होती. अभ्यासाची आवड नव्हती. एका मुलीसाठी त्याने वयाच्या आठव्या वर्षी घरातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. दिलजीतने एका मुलाखतीत खुलासा करताना सांगितलं होतं की, तो 8 वर्षांचा असताना घरातून पळून गेला होता. मात्र, नंतर एका व्यक्तीने त्याला घरी पाठवले.
सुरुवातीला गुरुद्वारामध्ये गाणं गायचा दिलजीत
दिलजीतने गुरूद्वारामध्ये गाणे गाऊन आपल्या गायनाच्या करिअरची सुरुवात केली. लुधियानामध्ये राहून त्याने दहावीपर्यंत शिक्षण घेतले आणि गुरुद्वारामध्ये कीर्तन करायला सुरुवात केली. इथूनच त्याला पुढे त्याचा मार्ग सापडला, त्यानंतर त्याने संगीताचे धडे गिरवले. यानंतर दिलजीतने लग्नसोहळ्यांमध्ये गाणं गायनाला सुरूवात केली आणि त्यानंतर 2004 मध्ये दिलजीतने पहिला अल्बन रिलीज केला. त्याच्या 2005 साली आलेल्या 'स्माईल' अल्बममुळे त्याला प्रसिद्धी मिळाली आणि त्याच्यासाठी पुढील मार्ग खुले होत गेले. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलं नाही.
View this post on Instagram
दिलजीत दोसांझ एका चित्रपटासाठी आकरतो 'एवढे' कोटी
मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिलजीत दोसांझ श्रीमंत पंजाबी गायकांपैकी एक आहे. तो कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक आहे. तो पर्सनल इव्हेंट, गाणी आणि चित्रपटांतून पैसे कमावतो. दिलजीत वैयक्तिक कार्यक्रमांसाठी 4 कोटी रुपये फी घेतो. राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांच्या प्री-वेडिंग इव्हेंटसाठी दिलजीतने सुमारे 4 कोटी रुपये मानधन घेतले होते. याशिवाय दिलजीत एका कॉन्सर्टमधून 50 लाख ते 1 कोटी रुपये कमावतो. याशिवाय तो एका चित्रपटासाठी 4 ते 5 कोटी रुपये फी घेतो.
महत्त्वाच्या इतर बातम्या :