एक्स्प्लोर
Maharashtra ‘हॉटेलवरून उडी मारतो म्हणाले होते’ Balaji Kalyankar बाबत Sanjay Shirsat यांचा गौप्यस्फोट
शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी नांदेडमधील एका कार्यक्रमात, जून २०२२ मधील बंडखोरीबाबत एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. शिरसाट यांनी दावा केला की, 'बंडखोरीवेळी आमदार बालाजी कल्याणकर यांना आम्ही घेऊन गेलो होतो पण त्यावेळी ते खूप नाराज होते, हॉटेलवरून उडी मारतो असं कल्याणकर म्हणाले होते'. शिरसाट म्हणाले की कल्याणकर सुरुवातीला द्विधा मनस्थितीत होते आणि आमदारकी रद्द झाल्यास काय होईल या चिंतेत होते. मात्र, एकदा त्यांच्यासोबत आल्यानंतर त्यांनी मतदारसंघात सर्वाधिक निधी मिळवून दाखवला, असेही शिरसाट यांनी नमूद केले.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
राजकारण
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement


















