Maharashtra : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात काही तरी मोठं घडणार? नेत्यांमध्ये काय शिजतंय?
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात काही तरी मोठं घडणार का? आणि हा प्रश्न उपस्थित करण्यासाठी कारणीभूत ठरल्या आहेत त्या काल दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी.. चार राज्यांमध्ये सत्ता कायम ठेवलेल्या भाजपचा आत्मविश्वास द्विगुणित झालाय... आणि या आत्मविश्वासासह भाजप नेते महाराष्ट्रात पर्यायी सरकार देण्याची भाषा करु लागलेत.... तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या गोटातल्या हालचाली देखील वाढल्या आहेत.. महाविकास आघाडीचे चाणक्य म्हणून ओळखले जाणाऱ्या शरद पवारांनी वर्षा बंगला गाठत उद्धव ठाकरेंशी तासभर चर्चा केली. तर दुसरीकडे भाजप नेते देखील राज्यपालांच्या भेटीला पोहोचले होते.. या राजकीय गाठीभेटींचा एकमेकांशी नक्कीच संबंध आहे हे सांगण्यासाठी राजकीय पंडितांची गरज नाही






















