एक्स्प्लोर
Local Body Polls: निवडणुकांचं भवितव्य आज ठरणार? 28 याचिकांवर HC मध्ये सुनावणी
राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं (Local Body Elections) भवितव्य आज ठरू शकतं, कारण या निवडणुकांना मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) आव्हान देणाऱ्या याचिकांवर आज एकत्रित सुनावणी होत आहे. 'मतदार यादीशी संबंधित याचिकाकर्त्यांनी आज संपूर्ण तयारीनिशी युक्तिवाद करावा,' अशा स्पष्ट सूचना मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर (Chief Justice Chandrashekhar) यांच्या खंडपीठाने दिल्या आहेत. मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेल्या एकूण २८ याचिकांवर ही तातडीची सुनावणी पार पडत आहे. यामध्ये मतदार यादी (Voter List), प्रभाग रचना (Delimitation) आणि आरक्षणासारख्या (Ward Reservation) गंभीर मुद्द्यांवर आक्षेप घेण्यात आला आहे. महत्त्वाचं म्हणजे, नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठात दाखल झालेल्या याचिकाही मुंबईत वर्ग करण्यात आल्याने या एकत्रित सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजी नगर
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement
Advertisement
















