Maharashtra : फडणवीसांच्या काळातील ऊर्जा विभागातील 6500 कोटींच्या कामांची चौकशी करा ABP Majha
जलयुक्त शिवारची चौकशी करणाऱ्या ठाकरे सरकारनं आता फडणवीस सरकारच्या काळातील ऊर्जा विभागाच्या कारभाराचीही चौकशी करण्याचं ठरवलंय. फडणवीस सरकारच्या काळातील ऊर्जा विभागातील साडेसहा हजार कोटींच्या कामांची चौकशी करण्याचे आदेश ऊर्जामंत्री नितीन राऊतांनी दिलेत. २०१४ ते २०१९ मधील पायाभूत सुविधांच्या कामाच्या तपासासाठी चौकशी समिती नेमण्याचा निर्णय ऊर्जा विभागानं घेतलाय. २०१४ ते २०१९ दरम्यान पायाभूत सुविधांकरिता साडेसहा हजार कोटींची कामं हाती घेण्यात आली. त्यात २०२० मध्ये विविध ठिकाणच्या आमदारांनी केलेल्या मागणीनुसार पुन्हा २३०० कोटींची कामं आता करावी लागताहेत. त्यामुळे आधीच साडेसहा हजार कोटींची कामं झालेली असतानाही पुन्हा त्याच पद्धतीची कामं का येताहेत, याची चाचपणी करण्याचे आदेश ऊर्जामंत्री नितीन राऊतांनी अधिकाऱ्यांना दिलेत. त्यामुळे पुन्हा एकदा भाजप विरुद्ध महाविकासआघाडी संघर्ष पेटताना दिसेल.



















