![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Salman Khan House Firing : सलमानच्या हत्येचा कट रचणाऱ्या Lawrence Bishnoi Gang मधील आणखी एकाला अटक!
Salman Khan: बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) जीवाला बिष्णोई गँगकडून धोका असताना दुसरीकडे त्याच्या फार्महाऊस बाहेरून एका 24 वर्षीय तरुणीला पोलिसांनी ताब्यात घेतले. ही तरुणी दिल्ली येथील असून सलमान खानसोबत लग्न करण्याच्या मागणीसाठी तिने फार्म हाऊसबाहेर गोंधळ घातला. ही घटना मागील महिन्यातील असल्याचे सांगण्यात येत आहे.
सलमान खानची तरुणांसोबत तरुणींमध्येही मोठी क्रेझ आहे. सलमानचे चाहते त्याच्यावर असलेले प्रेम वेगवेगळ्या मार्गाने व्यक्त करत असतात. याच प्रेमातून एका तरुणीने चक्क सलमान खानसोबत लग्न करण्यासाठी दिल्लीहून मुंबई गाठली.
नवी मुंबईतील पनवेलमध्ये सलमान खानचे फार्म हाऊस आहे. या फार्म हाऊसवर सलमान खान अनेकदा येत असतो. बॉलिवूडचे कलाकारही या ठिकाणी फार्म हाऊसवर येत असतात. याच फार्म हाऊसबाहेर एका 24 वर्षीय तरुणीने मोठा गोंधळ घातला. मला सलमान खानसोबत लग्न करायचे आहे अशी मागणीच या तरुणीने केली. फार्म हाऊसमधील लोकांनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीदेखील तरुणीचा गोंधळ सुरू होता. अखेर तक्रारीनंतर पोलिसांनी या 24 वर्षीय तरुणीला ताब्यात घेतले.
ही तरुणी सलमान खानची मोठी चाहती आहे. सलमान खानसोबत आपले लग्न व्हावे अशी या तरुणीची इच्छा आहे. हीच इच्छा फलद्रुप करण्यासाठी तीने थेट सलमान खानचे फार्म हाऊस गाठले. सलमान खान फार्म हाऊसमध्ये असेल या विचाराने तिने गोंधळ घालण्यास सुरुवात केली.
![MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/a59f16e1bf8d875a2db58b76c2cee9061719772089526977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Special Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/85a54e563d14e8c51cfaed4539a6c6911719771100889977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Headlines : 11 PM : 30 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/a56b4d11b65adfdf32ec233c370ec4a81719769980953977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![New criminal laws change : उद्यापासून भारतीय न्यायसंहिता आणि इतर दोन नवे कायदे लागू होणार ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/65d54277ce443f3c2f8bc6789da8678c1719769757088977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Lonavala : धबधब्यातून भुशी धरणात अख्खं कुटुंब गेलं वाहून, धक्कादायक VIDEO समोर ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/fad5ad1a9fc3820a687093aad8f0807b1719758859612977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)