एक्स्प्लोर
(Source: Poll of Polls)
Jain Muni VS Shankarachary : काशी-मथुरावरून जैन मुनी आणि शंकराचार्यांमध्ये जुंपली
काशी (Kashi) आणि मथुरा (Mathura) येथील मंदिर-मशीद वादावरून आता शंकराचार्य स्वामी प्रज्ञानानंद सरस्वती आणि जैन मुनी नीलेश चंद्र यांच्यात जुंपली आहे. ‘जब हमारा सबर का बाण टूट जाएगा तो काशी मथुरा भी छिन लेंगे हम तो,’ असा थेट इशारा जैन मुनी नीलेश चंद्र यांनी दिला आहे. यावर शंकराचार्यांनी तीव्र आक्षेप घेतला. जैन धर्माचे मुनी हिंसेचे समर्थन करत आहेत, जे त्यांच्या 'अहिंसा परमो धर्म' या मूळ तत्त्वाच्या विरोधात आहे, असे शंकराचार्य म्हणाले. रामजन्मभूमीप्रमाणेच काशी-मथुरा प्रश्नही न्यायालयीन मार्गानेच सोडवला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्याला उत्तर देताना मुनी नीलेश चंद्र म्हणाले की, अहिंसा हीच आमची संस्कृती आहे, पण धर्मावर आघात झाल्यास शास्त्राच्या ज्ञानासोबत शस्त्रही बाळगावे लागते.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















