Zydus Cadila Vaccine : डीएनए आधारित लस म्हणजे काय? काय आहे फार्माजेट टेक्निक?
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या विळख्यातून देश हळूहळू बाहेर पडत असली तरी संभाव्य तिसऱ्या लाटेची टांगती तलवार कायम आहे. आस्वदेशी कंपनी झायडस कॅडिला (Zydus Cadila) कंपनीच्या कोविड -19 वरील लस झायकोव्ह-डी (ZyCov-D)च्या आप्तकालीन वापरासाठी केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. देशात कोव्हिशिल्ड, को-व्हॅक्सिन, स्पुटनिक, मॉर्डनानंतर उपलब्ध होणारी ही पाचवी लस आहे. त्यामुळे कोरोनाविरोधातील लढा आणखी मजबूत होणार आहे
झायडस कॅडिलाची लस कोविड -19 विरूद्ध ही एका प्लाज्मिड डीएनए लस आहे, असा असा दावा कंपनीने केला आहे. झायडस कॅडिला लसची चाचणी 28,000 हून अधिक व्हॉलिन्टियर्सवर केली गेली आहे. त्यामुळे या लसीला मंजुरी मिळाल्यामुळे केवळ प्रौढच नव्हे तर 12 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना देखील लाभ होणार आहे.






















