Shivsena Hearing : उद्या पुन्हा सत्तासंघर्षावर सुनावणी, तुषार मेहता आणि कपिल सिब्बल यु्क्तिवाद करणार
सत्तासंघर्षावर सकाळी ११ पासून सुप्रीम कोर्टात सुरू आहे.. शिंदे गटाचे वकील हरीश साळवे यांनी आजही जोरदार युक्तिवाद केला. सत्ताधारी मुख्यमंत्र्यांवर जर अविश्वास असेल तर राज्यपालांनी बहुमत चाचणीचे आदेश देण्यात काहीच चुुकीचं नाही, असा युक्तिवाद हरीश साळवे यांनी केला. साळवेंनी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला.. शिवसेनेच्या आमदारांनी जे केलं तो बंड नव्हता, तो मतभेद व्यक्त करण्याचा प्रकार होता.. आमदार झाले म्हणजे आपलं मत व्यक्त करू नये असं नसतं.. सेनेच्या बहुतांश आमदारांचे उद्धव ठाकरेंची मतभेद होते, अशी बाजू साळवे यांनी मांडली. यानंतर शिंदे गटाचे दुसरे वकील नीरज किशन कौल यांनी युक्तिवाद सुरू केला. अंतर्गत मतभेद हा लोकशाहीचा भाग आहे.. मतभेद व्यक्त केले म्हणजे पक्षाविरोधात बंड केलं असं होेत नाही असं कौल म्हणाले.. गटनेता आणि प्रतोद याबाबतही कौल यांनी आपली बाजू मांडली. प्रतोद बदलल्याचं गटनेतेच अध्यक्षांना कळवतात, याआधीही सेनेनं जेव्हा प्रतोद बदलला तेव्हा गटनेत्यानंच कळवलं होतं, असा युक्तिवादही कौल यांनी केला.
![Suresh Dhas On Dhananjay Munde :धनंजय मुंडे कृषी मंत्री असतानाच्या निर्णयाची धस यांनी मागितली माहिती](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/323f4bc5e8256f57a5728993a9c47a311739720517327718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Chandrashekhar Bawankule PC | योजना बंद ते लाडक्या बहिणींचं बजेट, बावनकुळेंची पत्रकार परिषद](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/0093bc863ece82093f0c432c9a8bb82a1739717193950718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Ajit Pawar PC Nashik | धनंजय मुंडेंनी ठरवावं की राजीनामा द्यावा का? अजित पवार स्पष्टच म्हणाले...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/d3cb968e47c7016316edc5cf8ec2984b1739716914406718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![CM Devendra Fadnavis : कोण-कोणाला भेटलं यावर राजकारण नको : देवेंद्र फडणवीस](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/3ae832ef4285510d4269bc3cb80c730a1739714059642718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Sushma Andhare : पापाचे भागीदार होऊ नये म्हणून दादा सावध भूमिका घेत असतील : सुषमा अंधारे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/9d97540725ba735b2742c53d6310338a1739708921135718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)