ABP Majha Headlines : 04 PM : 27 February 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
राज्याच्या २०२४-२५ वर्षाच्या एकूण खर्चासाठी अंतरिम अर्थसंकल्प सादर..अर्थसंकल्पात ६ लाख ५२२ कोटींची तरतूद.. अर्थमंत्री अजित पवारांनी मांडला अर्थसंकल्प
अयोध्या, श्रीनगरमध्ये महाराष्ट्र भवन बांधणार, अजित पवारांची अर्थसंकल्पात घोषणा!
वस्त्रोद्योग धोरणाअंतर्गत पिवळ्या रेशन कार्ड धारकांना एक साडी मिळणार, अर्थसंकल्पात अजित पवारांची घोषणा
यंदाचा अर्थसंकल्प म्हणजे कंत्राटदार जोमात आणि शेतकरी कोमात, उद्धव ठाकरेंची सडकून टीका
२ मार्च रोजी बारामतीत नमो महारोजगार मेळावा, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ५ मार्च रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर, अकोला, जळगाव आणि संभाजीनगरमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन
कोल्हापूर लोकसभेसाठी संभाजीराजे छत्रपतीच महाविकास आघाडी उमेदवार असल्याची चर्चा, छत्रपती शाहू महाराजांसोबतचा जुना फोटो पोस्ट केल्यानं चर्चांना उधाण
मनोज जरांगेंच्या प्रक्षोभक वक्तव्याची आणि हिंसक घटनांची एसआयटी चौकशी करा, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे आदेश
कर नाही त्याला डर कशाला, एसआयटी चौकशीच्या आदेशवर जरांगेंची प्रतिक्रिया, चौकशी एकतर्फी नको सगळ्यांची करा, जरांगेंची मागणी
पुण्यातील मनसे नेते वसंत मोरेंनी घेतली शरद पवारांची भेट,पवारांची आढावा बैठक सुरू असतानाच मोेरे पोहोचल्यानं आश्चर्य व्यक्त
पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना २ वर्षांची मुदतवाढ मिळण्याची शक्यता, मुख्यमंत्री शिंदे सकारात्मक, लवकरच फाईलवर सही करणार असल्याची माहिती
गगनयान मोहिमेतील चार अंतराळवीरांची नावं पंतप्रधान मोदींकडून जाहीर, प्रशांत नायर, अंगद प्रताप, अजित कृष्णन आणि शुभांशू शुक्ला यांना अंतराळवीर बॅच प्रदान
पुण्याच्या चाकण परिसरात अल्पवयीन मुलांकडून मित्राची निर्घृण हत्या, मुलांची क्रूरता पाहून पोलिसांना देखील बसला धक्का
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून आठव्यांदा समन्स, ४ मार्च रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश