एक्स्प्लोर
Gangster-Politician Nexus | घायवळचा राम शिंदेंसोबतचा Video Viral, राजकीय वर्तुळात खळबळ FULL VIDEO
कुख्यात गुंड निलेश घायवळ आणि राम शिंदे यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. रोहित पवार यांनी आरोप केल्यानंतर हा व्हिडिओ समोर आला. रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यातील राजकीय वैर आता घायवळ प्रकरणापर्यंत पोहोचले आहे. निलेश घायवळ सध्या लंडनमध्ये असल्याची माहिती आहे. त्याच्यावर खंडणी आणि मोक्याचे गुन्हे दाखल असतानाही तो परदेशात कसा गेला, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन राम शिंदे, हिंगोलीचे आमदार संतोष बांगर आणि तानाजी सावंत यांच्या कुटुंबियातील एका व्यक्तीने घायवळला पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप केला. या आरोपांना भाजपने प्रत्युत्तर दिले आहे. भाजप जिल्हा उपाध्यक्ष सचिन पोटरे यांनी हे आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी फोटो पुरावा नसल्याचे सांगितले. निलेश घायवळने एका व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, "आमची चूक झाली होती. आम्ही नव्वद टक्के लोक आता पुन्हा एकदा राम शिंदेंकडे आलेला आहोत आणि त्यांना निवडून द्यायचा आहोत." या प्रकरणावरून गुंडांना राजकीय वरदहस्त मिळत असल्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पुणे पोलीस आणि सरकार यावर काय कारवाई करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महाराष्ट्र
Supriya Sule Meet Amit Shah : सुप्रिया सुळे आज दिल्लीत अमित शहांची भेट घेणार, कारण काय?
Shiv Sena UBT MNS Alliance Raj Uddhav Thackeray : दोन दिवसांत ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा?
Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























