एक्स्प्लोर
Raosaheb Danve :'मी मंत्री आहे, सरकारी कामं देतो', नातवाला पार्टनर करण्यासाठी दानवेंनीच उद्योजकाला दिली ऑफर?
माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांचे नातू शिवम पाटील (Shivam Patil) यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. 'मी आता मंत्री आहे, तुला सरकारी कामं आणून देईल, माझ्या नातवाला पार्टनर बनवून घे', असे सांगून रावसाहेब दानवे यांनीच व्यवहारासाठी सांगितले होते, असा गंभीर आरोप तक्रारदार आणि भाजप पदाधिकारी असलेल्या कैलास आहेर (Kailas Aher) यांनी केला आहे. आहेर यांच्या तक्रारीवरून नाशिकच्या सातपूर पोलीस ठाण्यात शिवम पाटीलसह आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंपनीत १४ टक्के भागीदारीसाठी २५ कोटी रुपयांचा व्यवहार ठरला होता, मात्र संपूर्ण रक्कम न देता फसवणूक केल्याचा आरोप आहेर यांनी केला आहे. रावसाहेब दानवे यांच्या सांगण्यावरूनच हा व्यवहार केल्याचे आहेर यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे, त्यामुळे या प्रकरणाला राजकीय वळण लागले आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
Advertisement

















