Farmers Crop Loss : अजित पवार आणि धनंजय मुंडे यांनी घेतलेला पीकनुकसानीचा आढावा
बातमी पावसासंदर्भात आहे.. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यात मंत्रालयामध्ये महत्त्वाची बैठक सूरू आहे.. राज्यात सातत्याने पडत असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये किती क्षेत्र बाधित झाला आहे याची माहिती अजित पवार धनंजय मुुंडे यांच्याकडून घेत आहेत. अजित पवार यांच्या मंत्रालयातील दालनात ही आढावा बैठक सुरू आहे. कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी देखील या बैठकीला उपस्थित आहेत. राज्यातील पूर परिस्थिती बाबत माहिती देण्यासाठी अनेक आमदार देखील अजित पवार यांची भेट घेत आहेत. वसमतचे आमदार राजू नवघरे, पालघरचे आमदार सुनिल भुसारा, शेखर निकम हे जिल्ह्यातील अती मुसळधार पावसाबाबत अजित पवार यांची भेट घेण्यासाठी आले आहेत.





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
