Electricity Demand Maharashtra : राज्यात गुरुवारी 23 हजार 561 मेगावॅट इतका वीजपुरवठा!
राज्यात उष्णतेचा पारा वाढत असतानाही महावितरणने गुरुवारी २३ हजार ५७१ मेगावॅट इतका विक्रमी वीज पुरवठा करून भारनियमन टाळले आहे. राज्यात मेमध्ये उन्हाचा पारा दिवसेंदिवस चढत आहे. विशेषतः विदर्भ आणि महाराष्ट्र या उन्हाने पोळत आहे. काही ठिकाणी ४३ ते ४४ अंशावर पारा चढत असल्यामुळे विजेची मागणी वाढत आहे. ग्रामीण भागातही वातानुकूलित यंत्रांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्यामुळे विजेची मागणी वाढत आहे. अशा परिस्थितीत महावितरणने विविध कंपन्यांकडून वीज खरेदी करून राज्यातील जनतेची गरज भागविली आहे. विजय अभया भाई कुठे भारनियमन करण्याची नामुष्की महावितरणवर आली नाही. वाढत्या मागणीमुळे वीज टंचाई निर्माण होऊ नये म्हणून ऊर्जामंत्री देवेंद्र फडवणीस स्वतः दक्षता घेत आहेत, याबाबत अधिकाऱ्यांना वारंवार सूचना देऊन वीज पुरवठ्याची काळजी घेत आहेत, अशी माहिती महावितरणचे जनसंपर्क अधिकारी भारत पवार यांनी दिली.
राज्यात १२ मे रोजी २२ हजार ३३ मेगावॅट आवश्यकता होती. १४ मे २२ हजार ६१९, १६ मे २२ हजार ४२२, १८ मे २३ हजार ७२, १९ मे २२ हजार ४२०, २१ मे २४ हजार ४१८,२२ मे २४ हजार ६०४ तर २३ मे रोजी २३ हजार ५७९ मेगावॅट इतकी विजेची मागणी होती. मात्र राज्यातील उद्योग धंदे आणि सर्वसामान्य नागरिकांची विजेची मागणी विवारात घेऊन ऊर्जा विभागाने ती पूर्ण करती.