Eknath Shinde Arrived Thane : काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरेगावातून ठाण्यात परतले
Eknath Shinde Arrived Thane : काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरेगावातून ठाण्यात परतले
दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर सध्या राज्याचे काळजीबाहू मुख्यमंत्री साताऱ्या मध्ये दाखल झालेल्या आहेत. आजच महायुतीची एक अत्यंत महत्त्वाची बैठक सुद्धा पार पडणार आहे.
ही बातमी पण वाचा
Eknath Shinde: उपमुख्यमंत्रीपदासह गुहमंत्रीपदाची मागणी? एकनाथ शिंदे म्हणाले, 'याबाबतची चर्चा महायुतीमध्ये....'
विधानसभा निवडणुका पार पडल्या त्यामध्ये महायुतीला मोठं यश मिळालं. मात्र, आता मंत्रीपद आणि मुख्यमंत्री या पदाचा पेच आता निर्माण झाल्याचं चित्र आहे. राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडला असला तरी देखील एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी काही महत्त्वाच्या पदांची मागणी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. भाजप नेतृत्वाकडून त्यांना उपमुख्यमंत्रिपदासह इतर काही मंत्रिपदांचं आश्वासन देण्यात आल्याच्या चर्चा आहेत. मात्र, गृहखातं शिवसेनेला मिळालं तरच मी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारेन, अशी अट एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी घातल्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहेत. याबाबत आज एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाष्य केलं आहे.
दरेगावमध्ये एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी तुम्ही गृहमंत्री, विधानसभा अध्यक्षपदाची मागणी केली आहे का? या प्रश्नावर उत्तर देताना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले, 'याबाबतची चर्चा महायुतीमध्ये होईल चर्चेतून बऱ्याचशा गोष्टी सुटतील आणि त्यामध्ये आम्हाला सर्वात महत्त्वाचं मतदारांनी महायुतीला निवडून दिलेलं आहे. त्या मतदारांना केलेल्या कमिटमेंट त्या राज्याच्या विकासाच्या दृष्टीने त्या पूर्ण करायच्या आहेत. मला काय मिळालं कोणाला काय मिळालं यापेक्षा जास्त जनतेला काय मिळणार आहे. महाराष्ट्रातील जनतेने आम्हाला भरभरून मतदान केलेलं आहे. मतांचा वर्षाव केलाय. आता त्यांना आमच्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करणार आहोत, असे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले आहेत





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
