CM Eknath Shinde Raigad Speech : शिवराज्याभिषेक सोहळ्यात मुख्यमंत्र्यांच्या दोन मोठ्या घोषणा
CM Eknath Shinde Raigad Speech : शिवराज्याभिषेक सोहळ्यात मुख्यमंत्र्यांच्या दोन मोठ्या घोषणा
Maharashtra News: मुंबईच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असलेला कोस्टल रोड आता छत्रपती संभाजी महाराजांच्या नावानं ओळखला जाणार आहे.
कुठून कुठपर्यंत असणार कोस्टल रोड?
मुंबईच्या दृष्टिकोनातून महत्वकांक्षी असलेला हा प्रकल्प तितकाच खर्चिक आहे. या रोडमुळे मुंबई आणि उपनगरातील वाहतूक कोंडी कमी होणार आहे. मुंबईचा कोस्टल रोड प्रकल्प हा दोन भागात विभागला गेला आहे. दक्षिण भाग आणि उत्तर भाग असे हे दोन भाग आहेत. यामध्ये दक्षिण भागाचं काम आधी हाती घेण्यात आलं आहे. मुंबई ते कांदिवली दरम्यान जवळपास 29 किलोमीटरचा हा कोस्टल रोड प्रकल्प आहे. दक्षिण कोस्टल प्रकल्प हा साडेदहा किलोमीटरचा आहे जो मरीन ड्राईव्हच्या प्रिन्सेस स्ट्रीट फ्लाओवर पासून सुरू होतो ते वरळी वांद्रे सी-लिंकपर्यंत आहे.



















