City 60 | राज्यातील मेट्रो शहरातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा सिटी सिक्स्टी ABP Majha
City 60 | राज्यातील मेट्रो शहरातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा सिटी सिक्स्टी ABP Majha
हे देखील वाचा
Ajit Pawar Camp: पिंपरी-चिंचवडमध्ये अजितदादांच्या बालेकिल्ल्याचे चिरे ढासळायला सुरुवात, शरद पवारांना भेटलेले ते 8 नगरसेवक कोण?
पुणे: लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातील सुनेत्रा पवार यांचा पराभव अजित पवार गटासाठी खूप मोठा झटका मानला जात आहे. सुनील तटकरे यांचा रायगडमध्ये विजय झाल्याने अजितदादा गटाची (Ajit Pawar Camp) अब्रू जाण्यापासून वाचली असली तरी विधानसभा निवडणुकीत काय होऊ शकते, याचा अंदाज राजकीय वर्तुळाला आहे. त्यामुळे सध्या अजितदादा गटात अस्वस्थतेचे वातावरण असल्याची चर्चा आहे. रोहित पवार (Rohit Pawar) हे सातत्याने अजित पवार गटाचे आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा करत आहेत.
अशातच आता अजित पवार यांच्या राजकीय कारकीर्दीच्या सुरुवातीपासून त्यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवडमधून अजितदादांना हादरे बसायला सुरुवात झाली आहे. कारण, पिंपरी चिंचवडचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह 16 नगरसेवकांनी शनिवारी मोदीबागेत शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. तर अजित पवार गटातील भोसरीचे माजी आमदार विलास लांडे हेदेखील शरद पवार यांच्या भेटीला जाणार असल्याचे समजते. त्यामुळे अजितदादा गटात मोठी खळबळ उडाली आहे. शरद पवारांची भेट घेतलेल्या 8 नगरसेवकांची नावं समोर आली आहेत.