City 60 : सिटी सिक्स्टी शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा : 01 जुलै 2024 : ABP Majha
लोकभावना लक्षात घेता दीक्षाभूमीच्या पार्किंगच्या कामाला स्थगिती , विधानसभेत फडणवीसांची घोषणा, तर समितीशी चर्चा करुनच विकास काम सुरु केल्याचंही फडणवीसांचं स्पष्टीकरण.
स्थगिती दिली असली तरी दीक्षाभूमी इथं पार्किंग होणार नाही अशी भूमिका घेणं गरजेचं, मुखयमंत्र्यांनी स्वतः सभागृहात येऊन सांगायला हवं, प्रकाश आंबेडकरांची मागणी.
देवेंद्र फडणवीसांच्या घोषणेपूर्वी दीक्षाभूमीच्या अंडरग्राऊंड पार्किंगविरोधात आंदोलन, अंडरग्राऊण्ड पार्किंग ही लाखो भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असल्याचं आंदोलकांचं म्हणणं.
दीक्षाभूमी परिसरातील अंडरग्राऊंड पार्किंगच्या कामाची आंदोलकांकडून तोडफोड आणि जाळपोळ, मोठ्या प्रमाणात आंबेडकर आनुयायांनी एकत्र येत केला पार्किंगच्या कामाला विरोध.
नागपूर दीक्षाभूमी आंदोलनस्थळाची विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांकडून पाहणी, समितीचा निर्णय मान्य नसेल, तर जनतेचा उद्रेक होईल, याचा विचार करून हे काम रद्द केले पाहिजे, वडेट्टीवारांची मागणी.
अंडरग्राऊंड पार्किंग होणार हे जाहीर झाल्यापासूनच लोक विरोध करतायत, मात्र विरोधानंतरही काम सुरु करण्यात आलं प्रकाश आंबेडकरांचा आरोप.