एक्स्प्लोर
Navnath Ban : 'मी डोरेमॉन असेल तर तुम्ही बावळट नोबिता आहात', धंगेकरांना प्रत्युत्तर
शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) आणि भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बंद (Navnath Band) यांच्यात कार्टून कॅरेक्टरवरून जोरदार राजकीय वाद सुरू झाला आहे. 'जर मी डोरेमॉन असेल तर तुम्ही बावळट नोबिता आहात', असे थेट प्रत्युत्तर नवनाथ बंद यांनी धंगेकरांना दिले आहे. हा वाद तेव्हा सुरू झाला जेव्हा धंगेकरांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यावर टीका केली होती, ज्यावर टीका करण्याची धंगेकरांची लायकी नसल्याचे बंद म्हणाले होते. यानंतर, धंगेकरांनी बंद यांचा फोटो समाजमाध्यमावर शेअर करत 'हा डोरेमॉन कोण?' असा प्रश्न विचारला. या टीकेला उत्तर देताना बंद यांनी ट्विट करून म्हटले की, 'बारा पक्ष फिरुन आलेले शिवसेना नेते, ज्येष्ठ नेते रवींद्रजी धंगेकर यांनी मला डोरेमॉन म्हटलंय, पण ते विसरले आहेत की डोरेमॉन उपाय शोधतो, लोकांना मदत करतो. तुमच्या म्हणण्यानुसार मी डोरेमॉन आहे तर तुम्ही बावळट नोबिता आहात.'
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement

















