Baramati : बारामतीत नमो राजगार मेळाव्याचं आयोजन, कार्यक्रमाच्या तयारीचा संपूर्ण आढावा
बारामतीतील नमो रोजगार मेळाव्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस आणि अजित पवार आज मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत... शरद पवार अध्यक्ष असलेल्या विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेच्या मैदानावर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. या कार्यक्रमासाठी सरकारकडून छापण्यात आलेल्या आधीच निमंत्रण पत्रिकेत शरद पवारांच नाव नसल्याने शरद पवार या कार्यक्रमास उपस्थित राहणार का असा प्रश्न विचारला जात होता. मात्र सरकारकडून तातडीनं दुसरी निमंत्रण पत्रिका छापून त्यात शरद पवारांच नाव टाकण्यात आल्याने ते या कार्यक्रमास जाणार असल्याचं स्पष्ट झालय. आगामी लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी संभाव्य लढत पाहता विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर होत असलेल्या या कार्यक्रमाकडे सगळ्यांच लक्ष असणार आहे.





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
