Bachchu Kadu : लाडकी बहिण योजनेचा पैसा काहींना बाप - दादांच्या कमाईचा वाटतो
Bachchu Kadu : लाडकी बहिण योजनेचा पैसा काहींना बाप - दादांच्या कमाईचा वाटतो
व्यांगांच्या बाबतीत भ्रष्टाचार हा एक शिष्टाचार झाल्याचे दिसतय... याचा लोकांना राग का येत नाही ?
बोगस दिव्यांग प्रमाणपत्राची नाव आमच्या वेबसाईटवर मागवली, खोलात जाऊन काम केलं
420 लोकांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे,कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे
आंदोलन करून सुद्धा आणि तुम्ही वारंवार बातमी दाखवून सुद्धा जर कारवाई होत नसेल तर ही खूप मोठी शोकांतिका आहे
21 तारखेला आम्ही पुन्हा एक आंदोलन करणार आहोत, दिव्यांग सचिवालयाच्या कार्यालयासमोर हे आंदोलन होईल..
दिव्यांगांचे मंत्री स्वतः मुख्यमंत्री आहेत, त्यांनी दखल घेतली पाहिजे
आज मुख्यमंत्री यांनी भेटायला बोलावलं आहे बैठक आहे असं नाही
आम्हाला नावापुरता दिव्यांग कल्याण अभियानाचा अध्यक्ष केला आहे, जिल्ह्यात जा आणि तक्रारी घ्या एवढंच आमचं काम आहे... दिव्यांग मंत्रालयाचे काय निर्णय होतात हे आम्हाला कळवलं सुद्धा जात नाही.. अनेक गोष्टींसाठी आम्हाला भांडावं लागतं आणि भांडून आम्ही ते करून घेतो
सरकारने जर आमच्या मागण्यांची दखल घेतली नाही तर निवडणुकीतून आम्ही दखल दाखवून देऊ
मी नाराज नाही पण लोक या सरकारवर नाराज आहे, तुम्ही तुमच्या आईला जर दूध मागितलं तर बाळ नाराज आहे असं होतं का?
तुम्ही लाडकी बहीण आणली पंधराशे रुपये देत आहे, दिव्यांगांचा महिना आता दीड हजार केला? अडचणीत असणाऱ्यांसाठी तुमची हात समोर येत नाहीत
लाडकी बहीण योजना चांगली आपण तुम्ही दिव्यांगांना का बाजूला ठेवता ? अनाथांना विधवा महिलांना का बाजूला ठेवता ? त्यांना तुम्ही लाडकी बहीण म्हणत नाही ?
विधवा महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा पगार मिळेल तेवढेच मिळणार, लाडकी बहिणीचा त्यांना फायदा होणार नाही ?





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
