Bachchu Kadu Beats Govt Employee : रिक्षा बंद झाली अन् बच्चू कडूंनी थेट कानशिलात लगावली,काय झालं?
Bachchu Kadu Beats Govt Employee : रिक्षा बंद झाली अन् बच्चू कडूंनी थेट कानशिलात लगावली,काय झालं?
छत्रपती संभाजीनगरात आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी एका अधिकाऱ्याला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. दिव्यांगांना वाटप करण्यात आलेल्या इ-रिक्षा (E-Rickshaw) खराब असल्याच्या तक्रारी आल्यानंतर बच्चू कडूंनी अधिकाऱ्यांना बोलावून त्यांची कानउघडली केली.
छत्रपती संभाजी नगरमध्ये (Chatrapati Sambhaji Nagar राज्य सरकारच्या योजनेतून दिव्यांगांना इ-रिक्षावाटप करण्यात आल्या होत्या. मात्र त्या इ-रिक्षा खराब होत्या अशी तक्रार दिव्यांगांनी बच्चू कडू यांच्याकडे केली. त्यामुळे बच्चू कडू यांनी संबंधित अधिकारी आणि कंपनीचे कर्मचारी रिक्षा पाहण्यासाठी बोलावले होतं. मात्र कंपनीने माहिती नसलेल्या एक कर्मचारी पाठवला. त्यामुळे बच्चू कडू चांगलेच त्याच्यावर संतापले आणि त्याच्या कानाशिलात लगावली, जर तुला काही माहितीच नाही तर इथे आला कशाला असा सवाल बच्चू कडू यांनी त्याला केला आणि या वेळेस उपस्थित सरकारी अधिकाऱ्यांनाही त्यांनी झापलं. योजनेतून जवळपास 500 रिक्षांचे वाटप करण्यात आलंय, पैकी 250 ते 300 रिक्षा या खराब असल्याचं बच्चू कडू यांचे म्हणणं आहे, कानाशिलात लगावलेला अधिकारी नाही तर कंपनीचा कर्मचारी होता असे कडू म्हणाले, या सगळ्या नादुरुस्त रिक्षा परत घ्याव्यात असे कडू यांनी सांगितलं. दरम्यान राज्य सरकार याबाबत चौकशी करेल असं आश्वासन दिव्यांग विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलं आहे.