Ajit Pawar NCP Manifesto : मुंबई, बारामतीत राष्ट्र्वादीचा जाहीरनामा, घोषणा कोण कोणत्या?
Ajit Pawar NCP Manifesto : मुंबई, बारामतीत राष्ट्र्वादीचा जाहीरनामा, घोषणा कोण कोणत्या?
विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्या ठिकाणीं आपला उमेदवार आहे त्याठिकाणी पक्षाचा विधानसभेसाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहे. मुंबईतून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ज्या ज्या ठिकाणी उमेदवार आहे त्या त्या ठिकाणी प्रत्येक उमेदवार जाहीरनामाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यास कोण कोणत्या योजना लागू करणार आहे. महाराष्ट्राचा जनतेला काय देणार आहे याची माहिती देण्यात येणार आहे. मुंबईत एमसीए येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आलं असून या ठिकाणी जाहीरनाम्यामध्ये काय असू शकतं याची एक झलक पाहायला मिळत आहे. लाडक्या बहिणींची रक्कम 1500 वरून 2100 रुपये सरकार आल्यावर करू म्हणजेच लाडक्या बहिणीला वर्षाकाठी 25 हजार रुपये देण्याचा प्रयत्न सरकारच्या वतीने होणार आहे. यासोबतच राज्यात तब्बल 25000 महिला पोलीस कर्मचाऱ्यांची भरती करू असा आश्वासन देखील अजित पवारांच्या वतीने देण्यात आलेला आहे पत्रकार परिषदेचा आढावा घेतला आहे