Ajit Pawar Beed Speech : सहन करणार नाही, मकोका लावेन !अजितदादांचा सज्जड दम
Ajit Pawar Beed Speech : सहन करणार नाही, मकोका लावेन !अजितदादांचा सज्जड दम
जिल्हा नियोजन समिती बैठकीसाठी बीडमध्ये आलेल्या अजित पवारांनी धनंजय मुंडेंच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांना सज्जड दम दिला... चुकीचं वागू नका, नाही तर मकोका लावायलाही मागेपुढे पाहणार नाही असा इशारा अजित पवारांनी दिला. विकासकामं करताना खंडणी मागू नका, चारित्र्य स्वच्छ ठेवा, पिस्तुलं वगैरे कमरेला बांधून फिराल तर परवाना रद्द कऱण्याचे आदेश देऊ असा इशारा अजित पवारांनी दिला. तसंच माझ्या स्तरावर असेल ते निर्णय मी घेईन, मुख्यमंत्र्यांच्या स्तरावरील निर्णय मुख्यमंत्री घेतील असं सूचक वक्तव्य धनंजय मुंडेंच्या समोर अजित पवारांनी केलं...





















