एक्स्प्लोर

Pankaja Munde Full Speech | आमदार झाल्यानंतर पंकजा मुंडे पहिल्यांदा भगवानगडावर ABP Majha

बीड: विधानपरिषद निवडणुकीत विजयी झाल्यानंतर पंकजा मुंडे या सोमवारी पहिल्यांदाच भगवानगडावर आल्या होत्या. यावेळी भगवानगडावर (Beed News) समर्थकांनी त्यांचे भव्य स्वागत केले. यावेळी पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसाचा केक कापण्यासोबत त्यांची पेढ्यांनी तुला करण्यात आली. पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी यावेळी आपल्या समर्थकांशी संवाद साधला. त्यांनी म्हटले की, माझं आणि तुमचे नाते हे भगवान बाबा आणि माझे जे नाते आहे, तसेच असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले. 

मी आज तुम्हाला फक्त भगवान बाबांसाठी फुले आणायला सांगितली होती. तुम्ही माझ्याविषयी जे प्रेम दाखवत आहात, त्याला कोणत्याही जातीधर्माची किनार नाही.  मी मुंडे साहेबांनी वचन दिले होते, मी थकणार नाही, रुकणार नाही. मोडेन पण वाकणार नाही. तुम्हाला वाटतंय की, फार मोठे युद्ध जिंकले आहे. पण मोठी लढाई आणखी बाकी आहे. माझ्या मंचासमोर माणसे नसावेत तो दिवस मला पाहायला मिळू नये. विधानपरिषदेची आमदारकी हा माझ्यासाठी सन्मान आहे, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले.

अहंकाराचे भांडण सोडा, एकजूट व्हा: पंकजा मुंडे

यावेळी पंकजा मुंडे यांनी आपल्या समर्थकांना महत्त्वाचे आवाहन केले. अहंकाराचे, पदाचे भांडण सोडा आणि एकजूट व्हा. एक वर्ष एकजुटीने घ्या. बीड जिल्ह्याने इतिहास घडवला आहे. मला तुमच्याकडूनही वचन हवे आहे. तुम्ही एकजूट राहण्याचे वचन द्या. काय करायचं आणि काय करायचं नाही याच भान ठेवा. आपल्याला काही कमी पडणार नाही, असा सल्ला पंकजा मुंडे यांनी आपल्या समर्थकांना दिला.

विधानपरिषद निवडणुकीत पंकजा मुंडेंचा विजय

तब्बल पाच वर्षांनी पंकजा मुंडे यांच्या भाळी विजयाचा गुलाल लागला आहे. 2019 मधील विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर राज्यसभा आणि विधानपरिषदेची प्रत्येकी निवडणूक आली की, भाजपकडून पंकजा मुंडे यांच्या उमेदवारीची चर्चा व्हायची. मात्र, त्यांचे राजकीय पुनर्वसन कधीच झाले नाही. लोकसभा निवडणुकीत पक्षाने त्यांना संधी दिली, पण मराठा फॅक्टरने त्यांना बालेकिल्ल्यातच पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे पंकजा मुंडे यांचे समर्थक प्रचंड हताश झाले होते. या सर्वांना पंकजा मुंडे यांच्या विधानपरिषद निवडणुकीतील विजयाने नवी उभारी मिळाली आहे. यानिमित्ताने पंकजा मुंडे यांची महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एन्ट्री झाली आहे.  

महाराष्ट्र व्हिडीओ

Vinod Tawde EXCLUSIVE : पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? विनोद तावडेंची स्फोटक मुलाखत

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात

बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार

मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी

कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Vinod Tawde EXCLUSIVE : पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? विनोद तावडेंची स्फोटक मुलाखतDilip Walse Patil : शरद पवार म्हणाले गद्दार, सुट्टी नाही! दिलीप वळसे-पाटलांची पहिली प्रतिक्रियाMahesh Sawant : नरेंद्र मोदींचा इफेक्ट संपला;त्यांची सभा आमच्यासाठी शुभ शकुनPrakash Mahajan on Amit Thackeray : भाजपचा अमित ठाकरेंना पाठिंबा , मोदींच्या सभेचा मनसेला फायदा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?

Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट

Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय

Embed widget