Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 30 एप्रिल 2021 | शुक्रवार | ABP Majha
1. राज्यात किमान 15 दिवस कडकडीत बंद पाळायलाच हवा, मुंबई हायकोर्टाची सूचना, तर लॉकडाऊनच्या कडक अंमलबजावणीचे पोलिसांना आदेश
2. परवानगी नसताना सुजय विखेंनी रेमडेसिवीरची खरेदी आणि वाटप कसं केलं? औरंगाबाद हायकोर्टाचा सवाल, तर सुजय विखेंवर गुन्हा दाखल करण्याची पोलिसांना मुभा
3. मुंबईत आजपासून तीन दिवस लसीकरण पुन्हा बंद, लसीच्या तुटवड्यामुळे ओढावली नामुश्की, तर नागरिकांनी लसीचा साठा माहीत करुनच लसीकरण केंद्रावर जावं, पालिकेचं आवाहन
4. पिंपरी चिंचवड महापालिकेचे कठोर निर्बंध, मंडईतून भाजी खरेदी करुन तासाभरात घर गाठणं बंधनकारक, अन्यथा 500 रुपयांचा दंड
5. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर पंतप्रधान नरेंद्र मोदींची महत्त्वाची बैठक, मोदींच्या अध्यक्षतेखाली सकाळी 11 वाजता होणार कॅबिनेट मिटिंग
6. देशात कोरोनाची तिसरी आणि चौथी लाटही येण्याची शक्यता, नितीन गडकरींचं वक्तव्य, तिसरी लाट थोपवण्यासाठी प्रशासनाची तयारी, आरोग्यमंत्र्यांची माहिती
7. काँग्रेसचे खासदार राजीव सातव सध्या व्हेंटिलेटरवर, मात्र उपचारांना चांगला प्रतिसाद, राज्यमंत्री विश्वजीत कदम यांची माहिती
8. अनिल देशमुखांविरोधातील पत्र मागे घ्या, अन्यथा एकामागोमाग एक चौकशी लावू, अशी धमकी दिल्याचा परमबीर सिंहांचा खळबळजनक आरोप, हायकोर्टात नवी याचिका
9. मुंबईतील अंधेरी एमआयडीसी पोलीस ठाण्याबाहेर अट्टल आरोपीचा धुडगूस, पेवर ब्लॉक पोलिसांच्या गाडीवर फेकून तोडफोड, अखेर पोलिसांकडून अटक
10. कोल्हापूरसह नाशिक, पुण्यात गारांचा मारा, अवकाळीमुळं शेतीचं नुकसान, तर विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज