एक्स्प्लोर

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 7 AM : 27 August 2024 : Maharashtra News

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 7 AM : 27 August 2024 : Maharashtra News

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर निवडणूक आयोगानं जम्मू काश्मीर विधानसभेसाठी निवडणूक जाहीर केली आहे. ही निवडणूक तीन टप्प्यांमध्ये होणार आहे. या निवडणुकीसाठी नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसनं आघाडी केली आहे. जम्मू काश्मीर विधानसभेच्या एकूण 90 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. नॅशनल कॉन्फरन्स 51 जागांवर निवडणूक लढेल. काँग्रेसला 32 जागा देण्यात आल्या आहेत. तर, दोन जागा मित्र पक्षांसाठी सोडण्यात आल्या आहेत. एक जागा माकपला तर एक जागा जेकेएनपीपी पक्षाला सोडण्यात आली आहे. पाच  जागांवर काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स यांच्यात मैत्रीपूर्ण लढत होणार आहे.  नॅशनल कॉन्फरन्सचे फारुक अब्दुल्ला आणि काँग्रेसचे के.सी. वेणुगोपाल यांच्या उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली आहे.   

जम्मू-काश्मीर काँग्रेसचे अध्यक्ष तारिक कर्रा यांनी एका जागेवर माकप आणि एका जागेवर जेकेएनपीपी पक्ष निवडणूक लढतील, असं म्हटलं. फारुक अब्दुल्ला यांनी यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की आनंदाची बाब आहे, जे लोकांमध्ये गट पाडण्याचा प्रयत्न करत होते त्यांच्या विरोधात मोहीम सुरु केली होती.इंडिया आघाडी यासाठीच निर्माण झाली होती. सांप्रदायिक शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी इंडिया आघाडी निर्माण झाली, आम्ही निवडणुकीच्या जागा वाटपाचा समझोता केला असल्याचं फारुक अब्दुल्ला म्हणाले.  

के.सी. वेणुगोपाल काय म्हणाले?

काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी भाजपनं उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरं दिली. भाजपला काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या आघाडीवर बोलण्याचा नैतिक अधिकार आहे का?  भाजपनं यापूर्वी नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपीसोबत युती केलेली आहे. नॅशनल कॉन्फरन्स जुनीच नॅशनल कॉन्फरन्स आहे. तर, पीडीपी देखील जुनीच पीडीपी आहे. भाजपनं दोन्ही पक्षांसोबत युती कलेली आहे. प्रत्येक राजकीय पक्षाचा आपला कार्यक्रम असतो, जाहीरनामा आणि आश्वासनं असतात. आमच्याकडे जाहीरनामा आहे. आम्ही जेव्हा सरकार बनवू तेव्हा किमान समान कार्यक्रम असेल, असं वेणुगोपाल म्हणाले.  

जम्मू काश्मीरमध्ये तीन टप्प्यांमध्ये मतदान पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान 18 सप्टेंबरला होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदान 25 सप्टेंबर तर तिसऱ्या टप्प्यातील मतदान 1 ऑक्टोबरला होणार आहे. तर,  4 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये पहिल्या टप्प्यात 24, दुसऱ्या टप्प्यात 26 आणि तिसऱ्या टप्प्यात 40 जागांवर मतदान होईल. ऑगस्ट 2019 मध्ये कलम 370 हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणूक होत आहे.  

महाराष्ट्र व्हिडीओ

Ramesh Chennithala On BJP : विदर्भाबाबत भाजपच्या सर्व्हेवरुन चेन्नीथलांनी उडवली खिल्ली
Ramesh Chennithala On BJP : विदर्भाबाबत भाजपच्या सर्व्हेवरुन चेन्नीथलांनी उडवली खिल्ली

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोदी सरकारची मोठी घोषणा; अंदमान-निकोबारच्या राजधानीचंच नाव बदललं; अमित शाहांकडून 'नामकरण'
मोदी सरकारची मोठी घोषणा; अंदमान-निकोबारच्या राजधानीचंच नाव बदललं; अमित शाहांकडून 'नामकरण'
Mhada lottery 2024 प्रतिक्षा संपली... म्हाडाच्या घरांसाठी 75,751 अर्ज आले; 2030 घरांसाठीच्या सोडतीची तारीख जाहीर
प्रतिक्षा संपली... म्हाडाच्या घरांसाठी 75,751 अर्ज आले; 2030 घरांसाठीच्या सोडतीची तारीख जाहीर
कांदा आणि बासमती तांदळाचे किमान निर्यात मूल्य हटवले, विधानसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा
कांदा आणि बासमती तांदळाचे किमान निर्यात मूल्य हटवले, विधानसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा
''आनंदाच्या शिधामधील डाळ निकृष्ट, साखरही पिवळसर;पाकिटातील तेलातही मारलाय काटा''
''आनंदाच्या शिधामधील डाळ निकृष्ट, साखरही पिवळसर;पाकिटातील तेलातही मारलाय काटा''
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Ramesh Chennithala On BJP : विदर्भाबाबत भाजपच्या सर्व्हेवरुन चेन्नीथलांनी उडवली खिल्लीArvind Kejriwal Bail : केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाकडून जामीन; 6 महिन्यांच्या जामिनावर बाहेरKaladhipati  : स्वप्निल जोशीसह अंधेरीच्या राजाचं दर्शन, गणेशोत्सव विशेष भाग 'कलाधिपती' : 13 Sep 2024BJP Survey   : भाजपचा अंतर्गत सर्व्हे, विदर्भात महायुतीची चिंता, विदर्भात केवळ 25 जागांचा निष्कर्ष

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोदी सरकारची मोठी घोषणा; अंदमान-निकोबारच्या राजधानीचंच नाव बदललं; अमित शाहांकडून 'नामकरण'
मोदी सरकारची मोठी घोषणा; अंदमान-निकोबारच्या राजधानीचंच नाव बदललं; अमित शाहांकडून 'नामकरण'
Mhada lottery 2024 प्रतिक्षा संपली... म्हाडाच्या घरांसाठी 75,751 अर्ज आले; 2030 घरांसाठीच्या सोडतीची तारीख जाहीर
प्रतिक्षा संपली... म्हाडाच्या घरांसाठी 75,751 अर्ज आले; 2030 घरांसाठीच्या सोडतीची तारीख जाहीर
कांदा आणि बासमती तांदळाचे किमान निर्यात मूल्य हटवले, विधानसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा
कांदा आणि बासमती तांदळाचे किमान निर्यात मूल्य हटवले, विधानसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा
''आनंदाच्या शिधामधील डाळ निकृष्ट, साखरही पिवळसर;पाकिटातील तेलातही मारलाय काटा''
''आनंदाच्या शिधामधील डाळ निकृष्ट, साखरही पिवळसर;पाकिटातील तेलातही मारलाय काटा''
गणपती बाप्पांचे विसर्जन करताना दोघे बुडाले; पोलिसांची समुद्रात धाव, सुदैवाने दोघांचा जीव वाचला
गणपती बाप्पांचे विसर्जन करताना दोघे बुडाले; पोलिसांची समुद्रात धाव, सुदैवाने दोघांचा जीव वाचला
Amol Mitkari: 'ही' तर बालिश नेत्याच्या डोक्यातील घाण; अमोल मिटकरींचा रोहित पवारांवर बोचरा आरोप
'ही' तर बालिश नेत्याच्या डोक्यातील घाण; अमोल मिटकरींचा रोहित पवारांवर बोचरा आरोप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
Port Blair Renamed Sri Vijaya Puram : देशातील आणखी एका शहराचे नामांतर; नेताजी सुभाष चंद्र बोस, सावरकरांचा संघर्ष पाहिलेल्या शहराचं नाव आता  'श्री विजयपूरम'
देशातील आणखी एका शहराचे नामांतर; नेताजी सुभाष चंद्र बोस, सावरकरांचा संघर्ष पाहिलेल्या शहराचं नाव आता 'श्री विजयपूरम'
Embed widget