ABP Majha Headlines : 05.00 PM : 13 Sep 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 05.00 PM : 13 Sep 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
मुलीशी चाळे करणाऱ्या भाजप नेत्याची क्लिप माझ्याकडे होती, सीडीबाबत बोलताना माझा कट्ट्यावर खडसेंचा गौप्यस्फोट, क्लिप देणारा सध्या कोट्यधीश, खडसेंचं सूचक वक्तव्य
दिल्लीतील अतिवरिष्ठ नेत्यांनी फोन केल्याने भाजपात प्रवेश करणार होतो, मात्र सहा महिने वेटिंगवर ठेवल्याने भाजपसमोर कायमची फुल्ली, कट्ट्यावर खडसेंकडून ब्रेकिंग न्यूज
मुलीची शपथ घेत फडणवीसांकडून राज्यपालपदाबाबत प्रयत्न करण्याचं वचन, एकनाथ खडसेंचा माझा कट्ट्यावर गौप्यस्फोट
महायुतीला विदर्भात २५ जागा मिळण्याचा भाजपच्या सर्व्हेतून निष्कर्ष, नागपुरात भाजपला केवळ ४ जागा मिळत असल्याचं सर्व्हेत धक्कादायक चित्र
सुप्रिया सुळेंनी जागवल्या अजित पवारांच्या वड़िलांच्या आठवणी, अनंतराव पवारांच्या जयंतीनिमित्त स्वतःता लहानपणीचा फोटो केला पोस्ट..
विदर्भातला महायुतीतला वाद चव्हाट्यावर, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील मविआ नेत्यांना विचारून निर्णय घेत असल्याचा गंभीर आरोप
काँग्रेस प्रथमच तीन पातळ्यांवर जाहीरनामा प्रसिद्ध करणार, राज्य, जिल्हा आणि प्रत्येक उमेदवाराचा स्वतंत्र जाहीरनामा राहणार..