एक्स्प्लोर

Mhada lottery 2024 प्रतिक्षा संपली... म्हाडाच्या घरांसाठी 75,751 अर्ज आले; 2030 घरांसाठीच्या सोडतीची तारीख जाहीर

Mhada lottery 2024 १९ सप्टेंबर, २०२४ रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेत आरटीजीएस/एनइएफटीद्वारे अनामत रकमेचा भरणा करण्याची मुदत आहे.

Mhada lottery 2024  मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा (म्हाडा) विभागीय घटक असलेल्या मुंबई मंडळातर्फे मुंबईतील विविध गृहनिर्माण प्रकल्पांमधील २०३० सदनिकांच्या विक्रीसाठी आयोजित संगणकीय सोडतीकरिता १९ सप्टेंबर, २०२४ रोजी दुपारी १२.०० वाजेपर्यंत अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत असून १९ सप्टेंबर, २०२४ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाइन अनामत रकमेचा भरणा अर्जदारांना करता येणार आहे. सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेला ०९ ऑगस्ट, २०२४ रोजी दुपारी १२ वाजेपासून प्रारंभ झाला. सोडतीला अर्जदारांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून सोडतीसाठी आज १३ सप्टेंबर, २०२४ रोजी सायंकाळी ०७.०० वाजेपर्यंत ७५,५७१ अर्ज प्राप्त झाले असून सुमारे ५५,००० अर्ज अनामत रकमेसह प्राप्त झाले आहेत. ०८ ऑक्टोबर, २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता मुंबईतील नरीमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे संगणकीय सोडत काढली जाणार आहे. त्यामुळे, अर्जदारांची प्रतिक्षा लवकरच संपणार असून ऑक्टोबर महिन्यातच म्हाडाचं घरं अनेकांचं स्वप्न पूर्ण करणार आहे. 

१९ सप्टेंबर, २०२४ रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेत आरटीजीएस/एनइएफटीद्वारे अनामत रकमेचा भरणा करण्याची मुदत आहे. दि. २७ सप्टेंबर, २०२४ रोजी सोडतीसाठी प्राप्त अर्जाची प्रारूप यादी म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर सायंकाळी ०६.०० वाजता प्रसिद्ध केली जाणार आहे. दि. २९ सप्टेंबर, २०२४ रोजी दुपारी १२. ०० वाजेपर्यंत प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यापासून ऑनलाइन दावे हरकती दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. दि. ०३ ऑक्टोबर, २०२४ रोजी सायंकाळी ०६.०० वाजता सोडतीसाठी स्वीकृत अर्जाची अंतिम यादी म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर सायंकाळी ०६.०० वाजता प्रसिद्ध केली जाणार आहे. सोडत झाल्यानंतर सोडतीमधील यशस्वी व प्रतीक्षा यादीवरील अर्जदारांची नावे म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे.              

मुंबई मंडळाच्या सन २०२४ च्या सोडतीत अत्यल्प उत्पन्न गटासाठी (Economically Weaker Section) ३५९ सदनिका, अल्प उत्पन्न गटासाठी (Lower Income Group) ६२७ सदनिका, मध्यम उत्पन्न गटासाठी (Middle Income Group) ७६८ सदनिका, उच्च उत्पन्न गटासाठी (Higher Income Group) २७६ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या सोडतीत म्हाडाच्या मुंबई मंडळाने बांधलेल्या १३२७ सदनिका, विकास नियंत्रण नियमावली ३३ (५), ३३ (७) व ५८ अंतर्गत पुनर्विकास प्रकल्पातून विकासकांकडून गृहसाठा (Housing Stock) म्हणून म्हाडाला प्राप्त ३७० सदनिका (नवीन व मागील सोडतीतील सदनिका) व मागील सोडतीतील विविध वसाहतीतील विखुरलेल्या ३३३ सदनिकांचा समावेश आहे. सदनिकांच्या वितरणासाठी म्हाडाने कोणालाही प्रतिनिधी, सल्लागार व प्रॉपर्टी एजंट म्हणून नेमलेले नाही. अर्जदाराने कोणत्याही अशा व्यक्तीशी परस्पर व्यवहार करू नये तसे केल्यास मुंबई मंडळ कोणत्याही व्यवहारास / फसवणूकीस जबाबदार राहणार नाही, असे आवाहन म्हाडातर्फे करण्यात येत आहे.

हेही वाचा

''आनंदाच्या शिधामधील डाळ निकृष्ट, साखरही पिवळसर;पाकिटातील तेलातही मारलाय काटा''

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur VidhanSabha: अजितदादांनी थांबवलं तरी महिला आमदाराने थोपटले दंड; भाजप आमदाराविरोधात लढण्याचा ठाम निर्धार
अजितदादांनी थांबवलं तरी महिला आमदाराने थोपटले दंड; भाजप आमदाराविरोधात लढण्याचा ठाम निर्धार
Ganesh Visarjan : अहमदनगरमध्ये 2 युवकांचा तलावात बुडून मृत्यू, गणपती विसर्जनादरम्यान घडली घटना
अहमदनगरमध्ये 2 युवकांचा तलावात बुडून मृत्यू, गणपती विसर्जनादरम्यान घडली घटना
Amruta Fadnavis: अमृता फडणवीसांच्या कामाने मंगलप्रभात लोढा इम्प्रेस, म्हणाले, मी त्यांना आजपासून मॅम नव्हे तर 'माँ अमृता' अशी हाक मारणार
अमृता फडणवीसांना मी आजपासून मॅम नव्हे तर 'माँ अमृता' अशी हाक मारणार; मंगलप्रभात लोढांची तोंडभरुन स्तुती
Indias Exports : भारत विक्रम करणार! 2030 पर्यंत आखली 83.78 लाख कोटी रुपयांची योजना
भारत विक्रम करणार! 2030 पर्यंत आखली 83.78 लाख कोटी रुपयांची योजना
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Anant Ambani EXCLUSIVE : मी लालबाग राजाचा भक्त, ही सर्व त्याचीच कृपाLalbaugcha Raja Visarjan Aarti Girgaon Chowpatty : लालबागच्या राजाची निरोपाची आरतीTOP 70 News : सातच्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 16 Sept 2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 06 AM : 18 September 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur VidhanSabha: अजितदादांनी थांबवलं तरी महिला आमदाराने थोपटले दंड; भाजप आमदाराविरोधात लढण्याचा ठाम निर्धार
अजितदादांनी थांबवलं तरी महिला आमदाराने थोपटले दंड; भाजप आमदाराविरोधात लढण्याचा ठाम निर्धार
Ganesh Visarjan : अहमदनगरमध्ये 2 युवकांचा तलावात बुडून मृत्यू, गणपती विसर्जनादरम्यान घडली घटना
अहमदनगरमध्ये 2 युवकांचा तलावात बुडून मृत्यू, गणपती विसर्जनादरम्यान घडली घटना
Amruta Fadnavis: अमृता फडणवीसांच्या कामाने मंगलप्रभात लोढा इम्प्रेस, म्हणाले, मी त्यांना आजपासून मॅम नव्हे तर 'माँ अमृता' अशी हाक मारणार
अमृता फडणवीसांना मी आजपासून मॅम नव्हे तर 'माँ अमृता' अशी हाक मारणार; मंगलप्रभात लोढांची तोंडभरुन स्तुती
Indias Exports : भारत विक्रम करणार! 2030 पर्यंत आखली 83.78 लाख कोटी रुपयांची योजना
भारत विक्रम करणार! 2030 पर्यंत आखली 83.78 लाख कोटी रुपयांची योजना
Pune Ganpati Visarjan: पुण्यात पहिले पाढे पंचावन्न, चोख नियोजन करुनही विसर्जन लांबलं, 22 तास उलटूनही मिरवणुका सुरुच
पुण्यात पहिले पाढे पंचावन्न, चोख नियोजन करुनही विसर्जन लांबलं, 22 तास उलटूनही मिरवणुका सुरुच
Salman-Aishwarya Relationship : सलमान-ऐश्वर्याची लव्ह स्टोरीची कशी झाली सुरुवात? भाईजानच्या एक्स-गर्लफ्रेंडने सांगितलं...
सलमान-ऐश्वर्याची लव्ह स्टोरीची कशी झाली सुरुवात? भाईजानच्या एक्स-गर्लफ्रेंडने सांगितलं...
भारतात करोडपतींच्या संख्येत झपाट्यानं वाढ, 10 कोटी कमावणाऱ्यांची संख्या किती? काय सांगतो अहवाल? 
भारतात करोडपतींच्या संख्येत झपाट्यानं वाढ, 10 कोटी कमावणाऱ्यांची संख्या किती? काय सांगतो अहवाल? 
Railway Job: सरकारी नोकरीची मोठी संधी! आजच अर्ज करा, महिना 50000 रुपये पगार मिळवा
सरकारी नोकरीची मोठी संधी! आजच अर्ज करा, महिना 50000 रुपये पगार मिळवा
Embed widget