ABP Majha Headlines : 7 AM : 01 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 7 AM : 01 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
आजपासून दहावी बोर्डाच्या परीक्षांना सुरुवात, पहिला पेपर मराठीचा, राज्यातील १६ लाख, ९ हजार ४४५ विद्यार्थी देणार परीक्षा
बेस्टचा पास खरेदी करण्यासाठी आजपासून अधिकचे पैसे मोजावे लागणार, दैनंदिन पासच्या दरात १० रुपयांनी तर मासिक पासच्या दरात १५० रुपयांनी वाढ.
नवी दिल्लीमध्ये भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत ४ तास उमेदवारांच्या नावावर मंथन, आज पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस, अंतिम आठवडा प्रस्तावावर विरोधकांच्या प्रश्नांना सरकारउत्तर देणार
भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान राहुल गांधी नाशिकच्या काळाराम मंदिराला भेट देणार, मुंबईतल्या चैन्यभूमीवर यात्रेचा समारोप
२ मार्चला बारामतीत नमो रोजगार मेळावा, मेळाव्याच्या कार्यक्रमपत्रिकेत सुप्रिया सुळे, अमोल कोल्हेंचं नाव मात्र शरद पवारांचं नाव वगळलं, मात्र पवार कार्यक्रमाला उपस्थित राहणार
२ मार्च रोजी मेळाव्यानिमित्त मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री बारामतीत, शरद पवारांनी दिलेलं भोजनाचं निमंत्रण घेऊन जयंत पाटील वर्षावर, अजित पवार जाणार का याकडे लक्ष
महाविकास आघाडीची जागावाटपावर चर्चा पूर्ण, पण फॉर्म्युला नाही, दोन दिवसांत जागावाटपाचा फॉर्म्युला ठरण्याचा नेत्यांना विश्वास