ABP Majha Headlines 6 PM Top Headlines 6 PM 15 April 2025 संध्या 6 च्या हेडलाईन्स
ABP Majha Headlines 6 PM Top Headlines 6 PM 15 April 2025 संध्या 6 च्या हेडलाईन्स
शेतकऱ्यांसह संपूर्ण भारतासाठी मोठी खूशखबर, यावर्षी सरासरीच्या १०५ टक्के पावसाचा अंदाज, भारतीय हवामान विभागाची माहिती...
सिंधुदुर्गातील २०२३च्या प्रकाश बिडवलकर हत्याप्रकरणी चार आरोपींना अटक...तर हत्या पचवण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेत आरोपी शिरसाटचा प्रवेश, माजी आमदार वैभव नाईकांचा आरोप.
बीड जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांतली तिसरी हत्या, बाबासाहेब आगे या तरुणावर भर बाजारात धारदार शस्त्रानं वार, आरोपी पोलिसांना शरण...
सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडेंवर कुत्र्याचा हल्ला...भिंडेंवर शासकीय रुग्णालयात उपचार...खडबडून जाग्या झालेल्या महापालिकेकडून कुत्रे पकडण्याची मोहीम हाती...
मृत शिक्षणाधिकाऱ्याची सही वापरून २०१६ ते २०२४ दरम्यान १०० हून अधिक शिक्षकांची भरती...नागपूरच्या बोगस शिक्षक घोटाळ्यात धक्कादायक आरोप...सखोल तपास करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश...
चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यातील वाद मातोश्री दरबारी सुटला... आमच्यात वाद नव्हताच, बैठकीनंतर खैरेंची प्रतिक्रिया






















