ABP Majha Headlines : 3 PM : 3 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 3 PM : 3 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
शिवतीर्थावर दसऱ्याला घुमणार उद्धव ठाकरेंचाच आवाज, मुंबई महापालिकेकडून ठाकरे गटाला मेळाव्यासाठी शिवाजी पार्कची परवानगी
उद्धव ठाकरे गटाकडून नवं गोंधळ गीत प्रसिद्ध...सत्वर भुवरी ये म्हणत देवीला साकडं...अडीच वर्षे झाले कोर्टात न्याय मिळाला नसल्याची खंत..
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा १३ ऑक्टोबरनंतर होण्याची शक्यता, काही नियमांमुळे निवडणूक जाहीर करण्यास उशीर होत असल्याची सूत्रांची माहिती
नाना पटोले आणि बावनकुळे एकाच वेळी कोराडीच्या देवीदर्शनाला, दोघंही आईची लेकरे असल्याचं पटोलेंचं वक्तव्य, बावनकुळे म्हणाले राजकीय कटुता नाही..
बदलापूरच्या अक्षय शिंदे एन्काउंटरची न्यायालयीन चौकशी लवकर पूर्ण करा, हायकोर्टाचे आदेश, १८ नोव्हेंबरपर्यंत अहवाल सादर करण्याच्या सूचना
चंद्रपूरच्या काँग्रेसच्या बलात्कारी अमोल लोडेला पळून जायला स्थानिक नेत्यांनी मदत केली, देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप, आणखी काही पीडित आहेत का याचा तपास सुरू..