ABP Majha Headlines : 11 PM : 05 Jully : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
विधान परिषद निवडणुकीत तिन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी मविआची रणनीती ठरली, तर जिल्हा स्तरावर एकी व्हावी यासाठी विशेष प्रयत्न करणार
((तिन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी रणनीती))
विधान परिषद निवडणूक चुरशीची होणार, १२ पैकी एकाही उमेदवाराची माघार नाही
((कुणाचीच माघार नाही, चुरशीची होणार निवडणूक))
विधान परिषद निवडणुकीत घोडेबाजार होण्याची शक्यता, देवेंद्र फडणवीसांचा आरोप, तर आरोप करणारेच घोडेबाजार करतात, नाना पटोलेंचा पलटवार
((परिषद निवडणुकीत घोेडेबाजाराचा आरोप ))
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली सरसंघचालक मोहन भागवतांची भेट..राज्याच्या राजकारणासह विविध विषयांवर चर्चा
विश्वविजेत्या टी-२० टीमच्या मुंबईकर खेळाडूंचा विधिमंडळात सत्कार, सूर्यकुमारच्या कॅचवरून रोहित शर्माची टोलेबाजी...(())
दोन वर्षांपूर्वी ५० जणांच्या टीमनं काढली विकेट...टीम इंडियाच्या सत्कार सोहळ्यात मुख्यमंत्र्यांची राजकीय बॅटिंग...
((शिंदे, ५० जणांची टीम आणि विकेट!))
टीम इंडियाच्या व्हिक्ट्री परेडदरम्यान उत्तम कामगिरी बजावल्याबद्दल मुंबई पोलिसांचं विधानभवनातही कौतुक, मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि सूर्यकुमार यादवकडून कौतुकाची थाप
((मुंबई पोलिसांचं सर्वत्र कौतुक))
ठाणे महापालिकेच्या शिवाजी महाराज रुग्णालयात जून महिन्यात २१ नवजात बालकांचा मृत्यू... तर जानेवारीपासून जूनपर्यंत ८९ नवजात बालकं दगावली..
बजाज ऑटोनं लाँ केली जगातली पहिली सीएनजी बाईक, १०२ किलोमीटर प्रति किलो सीएनजी इतकं मायलेज असल्याचा दावा
((बजाज फ्रीडम १२५ CNG बाईक लाँच ))
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा आज संगीत सोहळा, सोहळ्याला बॉलीवूडसह, टीम इंडियाचीही हजेरी..