ABP Majha Headlines : सकाळी 10 AM वाजताच्या हेडलाईन्स :10 AM 03 Nov 2024 : एबीपी माझा लाईव्ह
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईतून फोडणार प्रचाराचा नारळ, आज कुर्ला-नेहरूनगर आणि अंधेरी पूर्वेला शिवसेनेची पहिली जाहीर प्रचार सभा.
लोकसभेला साहेबांना खूश केलं, आता विधानसभेला मला खूश करा, अजित पवारांचं बारामतीच्या मतदारांना भावनिक आवाहन..सलग तिसऱ्या दिवशी बारामतीच्या मतदारांसोबत..
हिंमत असेल तर अजित पवारांनी नवं चिन्ह घेऊन निवडणूक लढवावी, जितेंद्र आव्हाडांचं आव्हान..चोरांच्या टोळीपासून सावध राहण्याचाही सल्ला..
सत्ताधारी आमदारांना पोलिसांच्या गाड्यातून रसद जात असल्याच्या पवारांच्या आरोपांची चौकशी करु, तक्रार द्या..गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंनी दाखवली तयारी...
सदा सरवणकर सलग पाचव्या दिवशी माहीममधून निवडणूक लढवण्यावर ठाम, राज ठाकरेंनी न विचारता उमेदवार दिल्याचं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण
मनोज जरांगे मराठा- मुस्लिम- दलित असे समीकरण जुळवत आज उमेदवार देणार, अनेक मतदारसंघात इच्छुकांमध्ये एकमत होत नसल्याने सर्वच इच्छुक उमेदवारांची आज बैठक
नंदुरबारमधील पिंपळोद गावाजवळ भीषण अपघात,
भरधाव वाहनाची रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ३ दुचाकींना धड, ५ जणांचा मृत्यू, एकाची प्रकृती चिंताजनक