एक्स्प्लोर

भारतात करोडपतींच्या संख्येत झपाट्यानं वाढ, 10 कोटी कमावणाऱ्यांची संख्या किती? काय सांगतो अहवाल? 

देशातील करोडपतींच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.  गेल्या पाच वर्षांत 10 कोटींहून अधिक कमाई करणाऱ्या भारतीयांच्या संख्येत 63 टक्क्यांची वाढ झाली आहे.

Wealth Of Rich Indians : देशातील करोडपतींच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.  गेल्या पाच वर्षांत 10 कोटींहून अधिक कमाई करणाऱ्या भारतीयांच्या संख्येत 63 टक्क्यांची वाढ झाली आहे. सेंट्रम इन्स्टिट्यूशनल रिसर्चने आपल्या एका अहवालात याबाबतची माहिती दिली आहे. अहवालानुसार, वार्षिक 5 कोटी रुपयांहून अधिक कमाई करणाऱ्यांची संख्या 49 टक्क्यांनी वाढून 58,200 झाली आहे.

31800 व्यक्तींची कमाई 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त 

सेंट्रम इन्स्टिट्यूशनल रिसर्चचा हा अहवाल एएनआयच्या हवाल्याने समोर आला आहे. या अहवालानुसार, गेल्या पाच वर्षांत वार्षिक 10 कोटी रुपयांहून अधिक कमाई करणाऱ्यांची संख्या 63 टक्क्यांनी वाढली आहे. या अहवालात असे सांगण्यात आले आहे की, देशात 31,800 लोक आहेत जे वार्षिक 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमावत आहेत. 

10 लाख लोकांची कमाई 50 लाखांच्या वर 

सेंट्रम इन्स्टिट्यूशनल रिसर्चनुसार, वार्षिक 50 लाखांपेक्षा जास्त कमावणाऱ्या भारतीयांच्या संख्येत 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. वार्षिक 50 लाखांपेक्षा जास्त कमाई करणाऱ्यांच्या श्रेणीत सुमारे 10 लाख लोक येतात. अहवालानुसार, 2018-19 ते 2023-24 या आर्थिक वर्षात वार्षिक 10 कोटींहून अधिक कमाई करणाऱ्यांची संख्या 121 टक्क्यांनी वाढली आहे आणि अशा लोकांची एकूण संपत्ती 38 लाख कोटींवर पोहोचली आहे. वार्षिक 5 कोटींहून अधिक कमाई करणाऱ्या लोकांची संख्या दरवर्षी 106 टक्क्यांनी वाढली आहे आणि या श्रेणीत येणाऱ्या लोकांची एकूण संपत्ती 40 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. वार्षिक 50 लाख रुपयांपेक्षा जास्त कमाई करणाऱ्या लोकांच्या संख्येत 64 टक्क्यांनी वाढ झाली असून पाच वर्षांत त्यांची संपत्ती 49 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

HNI ची संपत्ती 2028 पर्यंत 2.2 ट्रिलियन डॉलरपेक्षा जास्त 

भारतातील उच्च नेट वर्थ व्यक्ती आणि अल्ट्रा हाय नेट वर्थ व्यक्तींची एकूण आर्थिक मालमत्ता 2023 पर्यंत 1.2 ट्रिलियन डॉलरवरुन 2028 पर्यंत 2.2 ट्रिलियन डॉलरपर्यंत वाढेल. 2023-2028 दरम्यान, या श्रेणीतील लोकांच्या संपत्तीत 13 ते 14 टक्के वार्षिक वाढ होईल असा अंदाज अहवालात सांगितला आहे. लोकांच्या उत्पन्नात एवढी मोठी वाढ होऊनही केवळ 15 टक्के संपत्ती व्यावसायिकांकडून सांभाळली जाते, तर विकसित देशांमध्ये ही संख्या 75 टक्के आहे. दरम्यान, एका बाजूला श्रीमंत लोकांची संख्या वाढत असतानाच दुसऱ्या बाजूला देशातील गरीब लोकांच्या संख्येतही वाढ होताना दिसत आहे. त्यामुळं गरीब श्रीमंत दरी वाढत असल्याचं देखील समोर आलं आहे. गरीब अधिकच गरीब होतोय तर श्रीमंत अधिक श्रीमंत होत असल्याचं चित्र दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या:

Youngest Billionaires: वय 33 वर्ष, संपत्ती  8000 कोटींहून अधिक, 'हे' आहेत देशातील सर्वात तरुण अब्जाधीश

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

थंडी ओसरली! दक्षिणेत पावसाला पोषक स्थिती, महाराष्ट्रात येत्या 24 तासात तापमान बदलणार
थंडी ओसरली! दक्षिणेत पावसाला पोषक स्थिती, महाराष्ट्रात येत्या 24 तासात तापमान बदलणार
Mahakumbh Stampede: महाकुंभ मेळ्यात मोठी चेंगराचेंगरी; फोटो आले समोर,  प्रत्यक्षदर्शींनी सांगितला, 'आँखो देखा हाल'
महाकुंभ मेळ्यात मोठी चेंगराचेंगरी; फोटो आले समोर, प्रत्यक्षदर्शींनी सांगितला, 'आँखो देखा हाल'
Horoscope Today 29 January 2025 : आज पौष अमावस्या; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज पौष अमावस्या; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Zeeshan Siddique : आपल्या जीवाला धोका, जबाबात ज्यांची नावं घेतली त्यांची पोलिस चौकशी करत नाहीत: झिशान सिद्दीकी
आपल्या जीवाला धोका, जबाबात ज्यांची नावं घेतली त्यांची पोलिस चौकशी करत नाहीत: झिशान सिद्दीकी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Munde Resignation Demand : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव, अजितदादांकडून बचाव?Ajit Pawar Full PC : बीड प्रकरणातील दोषींना फाशी होणार, कुणाचा संबध नसेल तर...UNCUT PCTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 06 PM : 28 January 2025 : ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM : 28 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
थंडी ओसरली! दक्षिणेत पावसाला पोषक स्थिती, महाराष्ट्रात येत्या 24 तासात तापमान बदलणार
थंडी ओसरली! दक्षिणेत पावसाला पोषक स्थिती, महाराष्ट्रात येत्या 24 तासात तापमान बदलणार
Mahakumbh Stampede: महाकुंभ मेळ्यात मोठी चेंगराचेंगरी; फोटो आले समोर,  प्रत्यक्षदर्शींनी सांगितला, 'आँखो देखा हाल'
महाकुंभ मेळ्यात मोठी चेंगराचेंगरी; फोटो आले समोर, प्रत्यक्षदर्शींनी सांगितला, 'आँखो देखा हाल'
Horoscope Today 29 January 2025 : आज पौष अमावस्या; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज पौष अमावस्या; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Zeeshan Siddique : आपल्या जीवाला धोका, जबाबात ज्यांची नावं घेतली त्यांची पोलिस चौकशी करत नाहीत: झिशान सिद्दीकी
आपल्या जीवाला धोका, जबाबात ज्यांची नावं घेतली त्यांची पोलिस चौकशी करत नाहीत: झिशान सिद्दीकी
Anand Mahindra: नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
हार्वेस्टर मालकांचे पैसे न दिल्यास वाल्मिकच्या दुसऱ्या बायकोची संपत्ती ताब्यात घेऊ; शेतकरी संघटनेचा इशारा
हार्वेस्टर मालकांचे पैसे न दिल्यास वाल्मिकच्या दुसऱ्या बायकोची संपत्ती ताब्यात घेऊ; शेतकरी संघटनेचा इशारा
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
Solpaur News: सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
Embed widget