ABP Majha Headlines : 03 PM : 26 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनाप्रकरणी भावेश भिंडेच्या कोठडीत वाढ, दंडाधिकारी न्यायालयानं सुनावली २९ मेपर्यंत पोलीस कोठडी.
घाटकोपर होर्डिंग उभारलं तेव्हा भावेश भिंडे कंपनीच्या डायरेक्टर पदावर नसल्याचा आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद,
घाटकोपर होर्डिंगच्या घटनेत १७ जणांचा मृत्यू.
नाशिकमध्ये सराफा व्यावसायिकांवर आयकर विभागाची धाड, सलग तीन दिवसांपासून आयकर विभागाची छापेमारी सुरू .
नाशिकमध्ये सराफ व्यावसायिकांवरील छाप्यात २६ कोटींची रोकड जप्त, तसंच ९० कोटींच्या बेहिशोबी मालमत्तेचे दस्तावेजही हस्तगत.
नाशिकमध्ये सराफ व्यावसायिकांवरील छापेमारीत बंगल्यातील फर्निचरच्या आत पैशांची रोकड आढळली, आयकर चुकवल्याच्या संशयावरून कारवाई करण्यात आल्याची माहिती.
धुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या डेडरगाव तलावातील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात घट, पंधरा ते वीस दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक.
छत्रपती संभाजीनगरमधील हरसुल तलावात 15 दिवस पुरेल एवढाच जलसाठा शिल्लक, मृतसाठ्यातून रोज 5 एम एल डी पाण्याचा उपसा.
वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील खैरखेडा गावात पाणीटंचाई कायम, पाण्यासाठी खैरखेडा गावातील नागरिकांची डोंगरकड्या वरून एक किलोमीटरची पायपीट.
नाझरे धरण आटलं, ५६ गावांवर पाणीटंचाईचं संकट
सांगलीच्या तासगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचा पाण्यासाठी रास्तारोको, विसापूर - पुनदी योजनेचे सिद्धेवाडी तलावात सोडलेले पाणी अचानक बंद केल्याने अंदोलन.