ABP Majha Headlines : 01: 00 PM 28 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
माझे आयुष्य एका ध्येयासाठी समर्पित, मी निवडणुकांचे कल किंवा निकालावर लक्ष देत नाही, पंतप्रधान मोदींचा दावा, रात्री ८ वाजता मोदींची एक्स्लुझिव्ह मुलाखत
दबावाला बळी पडू नका, काँग्रेस आमदार धंगेकरांची ससून डीनची भेट घेऊन सूचना...तावरे मंत्र्याच्या जवळचे असल्याने पद मिळाल्याचा आरोप...
ससूनमधील डॉक्टरांची चौकशी करण्यासाठी पल्लवी सापळेंची टीम ससूनमध्ये, तर चौकशी करणारे किती स्वच्छ? अंबादास दानवेंचा सवाल
ससून रूग्णालयाच्या कामकाजाची समीक्षा करून श्वेतपत्रिका काढा, खासदार सुप्रिया सुळेंची मागणी
सुप्रिया सुळेंवर सोनिया दुहान यांचा हल्लाबोल, सुप्रिया सुळेंमध्ये नेतृत्वगुण नाहीत, सुप्रिया सुळेंच्या जवळच्या काही लोकांमुळे पक्ष सोडत असल्याची टीका
मान्सूनपूर्व तयारीबाबत आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या बैठकीला सुरुवात, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह अधिकारी उपस्थित, दुष्काळी परिस्थितीचाही आढावा घेणार
विधानपरिषदेच्या चार जागांसाठी आज महायुतीची खलबतं, मनसेला मदत करणार की महायुती चारही जागांवर उमेदवार देणार याची उत्सुकता
मुंबई शिक्षण मतदारसंघाची निवडणूक राष्ट्रवादीनं लढवावी छगन भुजबळांची भूमिका...देवगिरी बंगल्यावरील बैठकीत चर्चा
डेरा सच्चा सौधा प्रमुख गुरमीत राम रहीमला पंजाब हरयाणा हायकोर्टाचा मोठा दिलासा, डेरा मॅनेजर रंजीतसिंग हत्याप्रकरणात निर्दोष मुक्तता, अखेरच्या टप्प्याचं मतदान होण्याआधी सुटका झाल्याने चर्चा