9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM : 26 ऑगस्ट 2024 : ABP MAJHA
9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM : 26 ऑगस्ट 2024 : ABP MAJHA
मुख्यमंत्री आज रायगड दौऱ्यावर, पलस्पा ते सिंधुदुर्गपर्यंत मुंबई - गोवा महामार्गाची करणार पाहणी.
महाविकास आघाडीची जागा वाटपासंदर्भात आज बैठक, मुंबईच्या जागांवर अंतिम चर्चा होण्याची शक्यता.
बदलापूर लैंगिक छळ प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेची पोलीस कोठडी आज संपणार, एसआयटी अक्षय शिंदेला कल्याण कोर्टात हजर करणार.
तक्रारीसाठी गेल्यावर पोलिसांनी ताटकळत ठेवलं, तर मेडिकलसाठी रात्री १२ नंतर नेलं, बदलापुरातील पीडितेच्या पालकांकडून इन्स्पेक्टर शुभदा शितोळेंचा पर्दाफाश
पीडित महिला घरातूनच ई-एफआयआर दाखल करू शकतात, महिला अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर जळगावात मोदींकडून कायद्याची आठवण, अप्रत्यक्ष बदलापूर पोलिसांची पोलखोल
श्रीजया चव्हाण विधानसभेच्या रणांगणात उतरण्यासाठी सज्ज, अशोक चव्हाण आणि श्रीजया यांची सर्वप्रथम एबीपी माझाला एकत्रित एक्स्क्लुझिव्ह मुलाखत
मनोज जरांगे आणि सरकारमध्ये समन्वयकाची भूमिका बजावण्याची अशोक चव्हाणांची तयारी, विधानसभा निवडणुकांची लॉटरी होऊ न देण्याचं आवाहन
आज ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गासाठी आॅरेंज अलर्ट जारी, मुंबई आणि पालघरसाठी यलो अलर्ट, उत्तर महाराष्ट्रातही अतिमुसळधार पावसाचा अंदाज
केंद्राप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारीत राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू, मार्च २०२४च्या प्रभावाने अंमलबजावणी, लाखो कर्मचाऱ्यांना होणार फायदा