100 Headlines : 100 हेडलाईन्स : बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर : 13 Sept 2024
अरविंद केजरीवालांना जामीन मंजूर, १० लाख रुपयांच्या दोन वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर, सीबीआयने दाखल केलेल्या खटल्यात मद्यविक्री घोटाळा केसमध्ये केजरीवालांना जामीन
देवेंद्र फडणवीस यांच्या घरातील बाप्पाच्या दर्शनासाठी आमदार, खासदार आणि मंत्र्यांची रीघ, मतदारसंघातील अंतिम टप्प्यातील कामे तात्काळ मार्गी लावा, महायुतीतल्या नेत्यांबद्दल बोलणं टाळा, फडणवीसांचा सल्ला.
भाजपच्या अंतर्गत सर्व्हेत विदर्भात महायुतीला २५ जागा, भाजपला १८ जागा , एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ५ जागा व अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला २ जागा, त्यातही नागपूर जिल्ह्यात भाजपला केवळ ४ जागा मिळत असल्याची सूत्रांची माहिती.
हा जनतेचा सर्वे नाही, मनाला शांत करणारा सर्वे. भाजपच्या अंतर्गत सर्व्हेबाबत बावनकुळेंची प्रतिक्रिया, बहुमताने महायुती सत्तेत बसेल बावकुळेंनी व्यक्त केला विश्वास.
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी १७० ते १७५ जागांवर विजय मिळवणार, खासदार संजय राऊतांचा दावा, तर जागावाटपाबाबत एकत्रित बसून चर्चा करू, राऊतांची माहिती.
महायुती महाराष्ट्रात बहुमतापेक्षा जास्त आकडा गाठणार, मंत्री शंभूराज देसाईंचा दावा, मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे व्हावे अशी दगडूशेठचरणी प्रार्थना केल्याची देसाईंची मागणी.