Loksabha MP Suspension : सरकारला चर्चा करायची नाही, दडपशाही सुरू : Supriya Sule
Loksabha MP Suspension : सरकारला चर्चा करायची नाही, दडपशाही सुरू : Supriya Sule
विरोधकांना हद्दपार करण्याचा सरकारचा प्रयत्न, सरकारला विरोधच नकोय, आजचा दिवस लोकशाहीसाठी काळा दिवस, निलंबनाप्रकरणी खासदार सुप्रिया सुळेंची टीका. Parliament Winter Session 2023: नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात (Parliament Winter Session) विरोधी पक्षांच्या खासदारांनी केलेल्या गदारोळामुळे मंगळवारी (19 डिसेंबर) आणखी 49 खासदारांना निलंबित करण्यात आलं. आज संसदेतून निलंबित करण्यात आलेल्या खासदारांची संख्या 141 वर पोहोचली आहे. तसेच, लोकसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं आहे. दरम्यान, भारतीय संसदेच्या इतिहासात खासदारांवर करण्यात आलेली ही सर्वात मोठी कारवाई असल्याचं संबोधलं जात आहे. राज्यसभा आणि लोकसभेतून निलंबित करण्यात आलेल्या सर्व खासदारांना संपूर्ण हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजात सहभागी होता येणार नाही. सुप्रिया सुळे, मनीष तिवारी, शशी थरूर, मोहम्मद फैसल, कार्ती चिदंबरम, सुदीप बंदोपाध्याय, डिंपल यादव आणि दानिश अली यांच्यासह लोकसभेतील अनेक विरोधी खासदारांना संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित करण्यात आलं आहे.
![Supriya Sule Meet Mahadev Munde : सुप्रिया सुळेंची दिवंगत महादेव मुंडेच्या घरी सांत्वनपर भेट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/69ec2002d3478a0a8487f35133bf529e1739867338500976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Supreme Court on Ranveer Allahbadia : रणवीर अलाहाबादियाने पासपोर्ट जमा करवा, सुप्रीम कोर्टचे निर्देश](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/ad5122683596ee8e4d305f23d595dd701739866818401976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Anandache Paan:ऐतिहासिक रहस्य कादंबरी 'प्रतिपश्चंद्र' उलगडताना लेखक Dr.Prakash Koyade यांच्याशी गप्पा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/fa61208a7ee7e9969346257f64dd24831739862680607976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Bharat Gogawale : 'पालकमंत्री पदाबाबत मी आणि दादा भुसे समदुखी,म्हणूनच भेटायला आलो'](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/9e9823058d0be16aefb6d49f76fe46961739860435569976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Sandeep Kshirsagar Massajog : 20 दिवसांनी माझ्या शहरात पाणी येतं, दादांचं काम माहिती आहे...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/0c0c8dd22c95904978ea6c531dd1db621739859726962976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)