Presidential polls : राष्ट्रपती निवडणुकीसाठी ममता बॅनर्जी यांचं 22 नेत्यांना पत्र
राष्ट्रपती निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर विरोधकांची मोट बांधण्याचे प्रयत्न सुरु झालेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी १५ जूनला दिल्लीत विरोधी पक्षाच्या २२ नेत्यांची बैठक बोलावलीय. यासाठी त्यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासह २२ नेत्यांना पत्र लिहिलंय. तर दुसरीकडे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही शरद पवार, ममता बॅनर्जी यांच्यासह विरोधी पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केलीय. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधकांशी चर्चा करण्याची जबाबदारी सोनिया यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावर सोपवली. विरोधकांनी परस्पर मतभेद विसरुन राष्ट्रपतीपदासाठी अशा व्यक्तीची निवड करावी जी देशातील संस्था आणि संविधानाचं रक्षण करेल असं सोनिया गांधी यांनी म्हटलंय. त्यामुळे राष्ट्रपतीपदासाठी विरोधकांची एकजूट होणार का याकडं लक्ष लागलंय.