(Source: ECI/ABP News/ABP Majha)
NCP BJP Alliance Nagaland : नागालँडमध्ये राष्ट्रवादी-भाजपच्या युतीमागे नेमकं काय समीकरण?
NCP BJP Alliance Nagaland : नागालँडमध्ये राष्ट्रवादी-भाजपच्या युतीमागे नेमकं काय समीकरण?
महाराष्ट्रात एकमेकांची उणीधुणी काढणारे. एकमेकांना पाण्यात पाहणारे. एकमेकांचे कट्टर शत्रू असलेल्या या दोन पक्षांची युती कशी? तर महाराष्ट्रातली युती फसल्यानंतर हे दोन्ही पक्ष नागालँडमध्ये एकत्र आलेत. नागालँडमध्ये अखेर राष्ट्रवादीची भाजपप्रणित सरकारला साथ दिलीए. एनडीपीपी आणि भाजपच्या सरकारला स्पष्ट बहुमत असताना आणि स्थिरतेसाठी कुणाची गरज नसताना राष्ट्रवादीनं विरोधात बसण्याऐवजी सत्तेत बसण्याचा निर्णय घेतलाय. राष्ट्रवादी, जेडीयू यांची तर भाजपशी फारकत घेतलीए. पण तरी नागालँडमध्ये मात्र त्यांनी सत्तेतच सहभागाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागालँडमध्ये विरोधकमुक्त, सर्वपक्षीय असं ऐतिहासिक सरकार बनणार आहे. राष्ट्रवादीच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रात मात्र राष्ट्रवादीच्या दुटप्पी भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जातायात.