Virginity Test on Honeymoon : 'सुहागरात्री सासरच्यांनी माझी व्हर्जिनिटी तपासली, अमानवी मार्गांचा वापर केला', विवाहित तरुणीनं पोलिस स्टेशन गाठलं अन्....
महिला व बालविकास विभागाच्या तपास अधिकाऱ्याने दिलेल्या गोपनीय अहवालात लग्नाच्या पहिल्या रात्री पीडितेच्या कौमार्य चाचणीसाठी सासरच्या लोकांनी अमानवी मार्गांचा अवलंब केल्याचे उघड झाले आहे.
Virginity Test on Honeymoon : हुंड्यासाठी छळ आणि लग्नाच्या पहिल्या रात्रीच कौमार्य तपासण्याची (Virginity Test on Honeymoon) धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडितेच्या तक्रारीवरून सासरच्या मंडळींविरुद्ध हुंडाबळीसाठी छळ आणि इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सासरच्या घरातून सुनेच्या छळाच्या घटना रोज समोर येत असतात. पोलिस ठाणे आणि कौटुंबिक न्यायालये अशा प्रकरणांच्या फायलींनी भरलेली असतात. मात्र, सुनेच्या छेडछाडीचे हे प्रकरण मध्य प्रदेशातील इंदूरमधून समोर आले आहे. हा प्रकार जाणून घेतल्यावर आपण कोणत्या समाजात वावरत आहोत, असा विचार करण्याची वेळ आली आहे.
न्यायालयाने या प्रथेची दखल घेतली
मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) एका महिलेने इंदूर कोर्टात तक्रार दाखल केली आहे. सासरच्या लोकांनी तिच्यावर 'कौमार्य चाचणी' (एक प्रक्रिया ज्यामध्ये मुलगी कोणाशीही जवळीक साधली आहे की नाही हे कळते, असा दावा केला जातो) करण्याचा प्रयत्न केला. या भयंकर प्रकाराची जिल्हा न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे.
'कौमार्य चाचणी' करण्याचा चुकीचा प्रयत्न केला
महिलेने आरोप केला आहे की, तिच्या लग्नाच्या रात्री सासरच्या लोकांनी तिची 'कौमार्य चाचणी' करण्याचा चुकीचा प्रयत्न केला, ज्यामुळे तिला गंभीर मानसिक आणि शारीरिक त्रास झाला. तक्रारीवरून जिल्हा न्यायालयाने तिच्या सासरच्यांविरुद्ध गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. मध्य प्रदेशातील अशा प्रकारचे हे पहिलेच प्रकरण आहे, ज्यामध्ये 'कौमार्य चाचणी'च्या प्रथेला कायदेशीर आव्हान देण्यात आले आहे. डिसेंबर 2019 मध्ये पीडितेचा विवाह भोपाळमधील एका व्यक्तीशी झाला होता. लग्नानंतर गरोदर राहिल्यानंतर तीन महिन्यांतच तिचा गर्भपात झाला. नंतर नऊ महिने नऊ दिवस गर्भात राहिल्यानंतर तिने एका मृत मुलाला जन्म दिला. सध्या त्यांना एक मुलगी आहे.
कौमार्य चाचणीसाठी सासरच्या लोकांनी अमानवी मार्गांचा अवलंब केला
महिला व बालविकास विभागाच्या तपास अधिकाऱ्याने दिलेल्या गोपनीय अहवालात लग्नाच्या पहिल्या रात्री पीडितेच्या कौमार्य चाचणीसाठी सासरच्या लोकांनी अमानवी मार्गांचा अवलंब केला होता, अशी माहिती आहे. परिणामी तिला मानसिक आणि शारीरिक छळाचा सामना करावा लागला.
इतर महत्वाच्या बातम्या