Fuel and edible oil Tax : मोदी सरकार लवकरच इंधन आणि खाद्यतेलावरील कर कमी करणार
Fuel and edible oil Tax : मोदी सरकार लवकरच इंधन आणि खाद्यतेलावरील कर कमी करणार सर्वसामान्यांसाी मोठी बातमी आहे. मोदी सरकार लवकरच इंधन आणि खाद्यतेलावरील कर कमी करणार आहे, ज्यामुळे पेट्रोल, डिझेलचे दर कमी होतील. तसंच, भाज्यांचे दर कमी करण्यासाठी देखील पाऊलं उचलली जाणार आहेत. यासाठी विविध मंत्रालयांच्या बजेटमधून १ लाख कोटींची तरतूद करण्यात येणार आहे. गेल्या १५ महिन्यांमध्ये महागाई प्रचंड वाढली आहे. येत्या डिसेंबर महिन्यात पाच राज्यांमध्ये निवडणूक होणार आहे, तर एप्रिल आणि मे महिन्यांमध्ये लोकसभा निवडणुका आहेत. महागाईमुळे सरकारं पडल्याचा इतिहास सर्वच राजकीय पक्षांना माहीत आहे. त्यामुळे निवडणुकीच्या वर्षात जनतेचा रोष पत्करणं मोदी सरकारला परवडणारं नाहीये, असं तज्ज्ञांचं मत आहे.





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
