Budget 2022: उद्या संसदेत अर्थसंकल्प सादर होणार, नागरिकांना दिलासा मिळणार? ABP Majha
५ राज्यांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध घोषणांची अपेक्षा असलेला देशाचा अर्थसंकल्प उद्या सादर होणार आहे. त्यासाठी आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतंय.. आजपासून सुरू होणारे संसदेचं अधिवेशन 31 जानेवारी ते 8 फेब्रुवारी आणि 14 मार्च ते 8 एप्रिल अशा दोन टप्प्यात होणार आहे. सकाळी ११ वाजता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणानं संसदेच्या दोन्ही सभागृहाचे कामकाज सुरू होईल.. राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर सभागृहात आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर होणार आहे. त्यामुळे महागाईने त्रस्त नागरिकांना दिलासा देणारं बजेट असणार का? निवडणुकांचा प्रभाव कशा पद्धतीनं या अर्थसंकल्पावर असेल अशा अनेक प्रश्नांची उत्सुकता आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज























