एक्स्प्लोर

Sanjay Raut on NCP: 'त्या' एका गोष्टीच्या भीतीने सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन गट विलीन होऊ देणार नाहीत; संजय राऊतांचा दावा

Sharad Pawar & Ajit Pawar camp NCP: शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र येतील, अशाच चर्चा सुरु आहे. मात्र, सुनील तटकरे या दोन्ही गटांना एकत्र येऊन देणार नाहीत.

Sharad Pawar & Aji Camp NCP: राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गट भविष्यात एकत्र येणार नाहीत, असे वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केले. अजितदादा गटाच्या बोलण्यात किती विरोधाभास आहेत बघा, आजही ते शरद पवार (Sharad Pawar) हेच आमचे नेते आहेत, असे सांगतात. आम्हीच मूळ राष्ट्रवादी आहोत हे सांगतात, एकत्र आले पाहिजे सांगतात, आणि जेव्हा ती वेळ येते तेव्हा एकत्र येत नाहीत. याचा अर्थ मोदींच्या मुख्य दुकानासोबत त्यांना आपले दुकान चालवायचे आहे. प्रफुल पटेल महान नेते नाहीत, तटकरे आता अध्यक्ष आहेत, उद्या हा पक्ष विलीन होणार नाही अशी माझी माहिती आहे. पण झाला तर सुनील तटकरे यांनी काय करायचे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यास सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्या प्रदेशाध्यपद आणि केंद्रातील मंत्रीपदांचा प्रश्न निर्माण होईल. प्रत्येक जण आपली सोय आणि आपला फायदा राजकारणात पाहतो, असे संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटले. ते शुक्रवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राऊतांच्या या वक्तव्यावर आता सुनील तटकरे काय प्रतिक्रिया देतात, हे पाहावे लागेल. 

या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी आणखी एक महत्त्वाचा दावा केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात कम्युनिकेशन गॅप आहे. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यातून विस्तवही जात नाही. आता शिंदे एका बेटावर उभे आहेत. अजित पवार दुसऱ्या टोकाला आहेत, आणि फडणवीस एका ठिकाणी आहेत. महाविकास आघाडी सरकार असताना एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंसोबतचा संवाद पक्का होता. हा संवाद कोमात का गेला, याचा विचार फडणवीसांनी करावा. अजित पवार यांचा सर्वात उत्तम संवाद हा उद्धव ठाकरे यांच्याशी होता. आता या संवादात मिठाचा खडा का पडतो आहे. याचा अर्थ सर्वकाही आलबेल नाही, दहशतीपोटी, भीतीपोटी एकत्र राहिले आहेत, आपल्यावर कारवाई होऊ नये म्हणून सगळे एकत्र आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटले.
 
नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांचे कौतुक केले होते. निवडणुकीत जिंकू दे अथवा हरु दे, शरद पवार हे सातत्याने राजकारण करत राहतात.  ते या वयातही मेहनत करतात, असे फडणवीसांनी म्हटले होते. याविषयी विचारणा केली असता राऊत यांनी म्हटले की, शरद पवार सगळ्यांपेक्षा मोठे आहेत, त्यांच्या कौतुकाने पवार मोठे होते नाहीत, ते आधीपासून टोलेजंग आहेत, अशी टिप्पणी राऊतांनी केली. 

Sanjay Raut: महिला आयोगावर राजकीय नेत्यांची नियुक्ती नको: संजय राऊत

महिला आयोगावर अराजकीय सदस्य असायला हवेत. इकडे राजकीय नेत्याच्या जवळच्या महिला यांची नियुक्ती केली जाते, कारण त्याला कॅबिनेट दर्जा आहे. मात्र राज्य महिला आयोग असेल किंवा केंद्रीय महिला आयोग असेल तिकडे अराजकीय महिलांनाच अध्यक्ष आणि सदस्य नेमायला हवे, असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले. यावेळी संजय राऊत यांनी ठाकरे गटाचे नेते चंद्रहार पाटील शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चेवरही भाष्य केले. उदय सामंत यांना चंद्रहार पाटील वारंवार भेटतात आणि त्यावर ते खुलासा देखील करतात, ठीक आहे आता त्यांच्याशी मी चर्चा करेन , असे राऊत यांनी म्हटले.

आणखी वाचा

मोठी बातमी : आम्ही विचाराने एकच, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आश्चर्य वाटणार नाही, शरद पवारांनी पत्ता टाकला!

गेल्या 7 वर्षांपासून एबीपी माझाशी नाळ बांधली आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचे वार्तांकन करताना, ठाणे जिल्ह्याची जबाबदारी देखील सांभाळत आहेत. यासोबतच राजकीय बातम्या विशेषतः शिंदे गटाची जबाबदारी यांच्याकडे आहे. याआधी मी मराठी, जय महाराष्ट्र सारख्या वृत्त वाहिन्यात आणि वृत्तपत्रात कामाचा अनुभव आहे

Read More

महत्त्वाच्या बातम्या

अवास्तव मागण्या पूर्ण कशा होणार? मुख्यमंत्र्यांना शिव्या देऊन मार्ग निघणार नाही, जरांगे पाटलांच्या उपोषणासंदर्भात नेमकं काय म्हणाले महाजन? 
अवास्तव मागण्या पूर्ण कशा होणार? मुख्यमंत्र्यांना शिव्या देऊन मार्ग निघणार नाही, जरांगे पाटलांच्या उपोषणासंदर्भात नेमकं काय म्हणाले महाजन? 
मोदी म्हणाले, जगाची निम्मी लोकसंख्या BRICS मध्ये; तिकडं रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन युरोपवर बरसले, म्हणाले, 'जी7 ला 'ग्रुप ऑफ सेव्हन' का म्हटलं जातं कळत नाही..'
मोदी म्हणाले, जगाची निम्मी लोकसंख्या BRICS मध्ये; तिकडं रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन युरोपवर बरसले, म्हणाले, 'जी7 ला 'ग्रुप ऑफ सेव्हन' का म्हटलं जातं कळत नाही..'
पर्युषण पर्वात शाळेत कांदा, लसूण नको म्हणणाऱ्या भाजप आमदाराच्या हॉटेलमध्ये जोरात विक्री; मनसेनं उघडं पाडलं
पर्युषण पर्वात शाळेत कांदा, लसूण नको म्हणणाऱ्या भाजप आमदाराच्या हॉटेलमध्ये जोरात विक्री; मनसेनं उघडं पाडलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 सप्टेंबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 सप्टेंबर 2026 | शुक्रवार

व्हिडीओ

MPSC Paper Leak : पेपरफुटीचं जाळं, तोंडाला काळ Special Report
Pune Fake Khawa : भेसळखोरीचा खवा, मुंढेजी धडा शिकवा Special Report
Navi Mumbai MPSC Mahendra Harpalkar News : MPSC सचिवांना काळं फासलं,संभाजी ब्रिगेडकडून आक्रमक भूमिका
Nitin Gadkari On Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्ग १६-१७ वर्षे रखडल्याबद्दल लाज वाटते, उद्घाटनाला जाणार नाही
Eknath Shinde Visit London : साहेबांच्या देशात... साहेबाच्या भाषेत... | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रिटायरमेंट अवघ्या 5 दिवसांवर असताना IAS अधिकाऱ्याविरोधात ACB कडून गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल!
रिटायरमेंट अवघ्या 5 दिवसांवर असताना IAS अधिकाऱ्याविरोधात ACB कडून गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल!
UPI Tap And Pay Feature: UPI मध्ये नवीन टॅप अँड पे सुविधा! आता एटीएम किंवा क्रेडिट कार्डची गरज नाही, थेट फोन स्वॅप करा अन् पैसे पाठवा; इंटरनेटची सुद्धा गरज नाही, एकावेळी किती हजारची मर्यादा?
UPI मध्ये नवीन टॅप अँड पे सुविधा! आता एटीएम किंवा क्रेडिट कार्डची गरज नाही, थेट फोन स्वॅप करा अन् पैसे पाठवा; इंटरनेटची सुद्धा गरज नाही, पेमेंट फेल झाल्यास तत्काळ परतावा, एकावेळी किती हजारची मर्यादा?
होर्मुझनंतर आता आणखी एक तेलमार्ग संकटात; हौथी बंडखोरांनी अल मंदेब ताब्यात घेतला, आशिया आणि युरोप दरम्यान महत्त्वाचा सागरी मार्ग, कोणाची जहाजे सोडणार अन् कोणता नाही हे सुद्धा जाहीर केलं!
होर्मुझनंतर आता आणखी एक तेलमार्ग संकटात; हौथी बंडखोरांनी अल मंदेब ताब्यात घेतला, आशिया आणि युरोप दरम्यान महत्त्वाचा सागरी मार्ग, कोणाची जहाजे सोडणार अन् कोणता नाही हे सुद्धा जाहीर केलं!
Video: इस्रायलने लेबनॉनमधील 2 किमी लांबीचा बोगदा तब्बल 1100 टन स्फोटकांनी उडवला; स्फोटानंतर 4.1 तीव्रतेचा भूकंपासारखा झटका
Video: इस्रायलने लेबनॉनमधील 2 किमी लांबीचा बोगदा तब्बल 1100 टन स्फोटकांनी उडवला; स्फोटानंतर 4.1 तीव्रतेचा भूकंपासारखा झटका
OneTag: मोबाईल सिमप्रमाणे फास्टॅग सुद्धा पोर्ट करता येणार, स्टिकर न बदलता बँक बदलण्यासाठी 'वनटॅग' सेवा
मोबाईल सिमप्रमाणे फास्टॅग सुद्धा पोर्ट करता येणार, स्टिकर न बदलता बँक बदलण्यासाठी 'वनटॅग' सेवा
मुंबईकर गणपतीसाठी गावी निघाला, ट्रॅफिकमध्ये अडकला; पश्चिम द्रुतगती महामार्गावर 40 मिनिटांच्या प्रवासासाठी 2 तास
मुंबईकर गणपतीसाठी गावी निघाला, ट्रॅफिकमध्ये अडकला; पश्चिम द्रुतगती महामार्गावर 40 मिनिटांच्या प्रवासासाठी 2 तास
दिशाच्या वडिलांचा जबाब सीबीआयकडे नोंद; दोन दिवसांतच FIR दाखल होणार, आरोपींना अटक करण्याची मागणी

Embed widget