एक्स्प्लोर

PSKB vs RCB IPL 2025 : पंजाबचे अपयश, बंगळूरचे (शर्मा) सुयश

PSKB vs RCB IPL 2025 : काल झालेल्या पहिल्या क्वालिफायरमध्ये बंगळूर संघाने पंजाबचा दारुण पराभव करून दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला...याला कारण होते पंजाबचा आत्मघात...त्यांच्या सर्व फलंदाजांनी मेंदू बाहेर ठेवून केलेली फलंदाजी..खराब शॉट सिलेक्शन हे आत्मघाताचे प्रमुख कारण...

नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारून रजत पाटीदार यांनी पंजाब संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रण दिले... पॉइंटमधून एक देखणा फटका खेळून प्रियांशने छान सुरुवात देखील केली...पण यश दयाळ याला व्ही मधे खेळताना प्रियांश बाद झाला आणि तिथून पंजाब संघ कोसळण्याची सुरुवात झाली....आज बंगळूरकडे हेजल वूड होता...जेव्हा तो संघात असतो तेव्हा प्रतिपक्ष 7.5 इतक्या सरासरीने धावा काढतो आणि जेव्हा तो संघात नसतो तेव्हा ती सरासरी 11 एवढी असते...इतका मोठा इम्पॅक्ट तो आपल्या उपस्थितीने देतो..आज सुद्धा त्याने कसोटी क्रिकेटमधील लाईन आणि लेन्थ ठेवली...आणि त्याचे फळ त्याला मिळाले..खरे तर ज्या भुविच्या षटकात दोन चौकार आलेले आहेत त्याच्या त्याच षटकात तिसरा चौकार मारण्याच्या नादात प्रभ सिमरन याने आत्मघातला सुरुवात केली...आणि तोच आत्मघात पंजाबच्या प्रत्येक फलंदाजाने डाव संपेपर्यंत चालू ठेवला...त्याच्यानंतर श्रेयस हेझल वूडच्या गोलंदाजीवर आक्रमक फटका खेळताना बाद झाला...एका उसळत्या चेंडूवर हूक करताना मागील सामन्यातील हिरो इंग्लिस फाईन लेगवर बाद झाला... नेहल वडेरा यश दयाळ याचा बळी ठरला...आणि या नंतर झाला तो सुयश शर्मा शो...

बंगळूर संघाचा हा गुणी लेग स्पिनर एक सुंदर ऍक्शन घेऊन येतो.. त्याच्याकडे चांगला लेग ब्रेक आहेच पण फणा काढून डंख मारणारा रॉंग वन देखील आहे...काल त्याने याच अस्त्राचा वापर पंजाब विरुद्ध केला.... आणि पंजाब संघाच्या मधल्या फळीतील फलंदाजाने त्या अस्त्राला ब्रह्मास्त्र समजून शरणागती पत्करली...सुरुवातीला शशांक खेळाची समज न ठेवता अती आक्रमक फटका खेळताना त्रिफळाचित झाला...त्याच्यानंतर आलेल्या इम्पॅक्ट सब फक्त तीन चेंडूचा धनी ठरला... मुशीर खान आज आपल्या बाबांचे दोन फटके खाल्ल्याशिवाय राहणार नाही... पंजाब संघ अडचणीत असताना सुयश याच्या गोलंदाजीवर तो आज जो फटका खेळला त्याला क्षमा नाही. ....इतर वेळेस हा फटका चालून गेला असता पण काल ती वेळ नव्हती.. आयपीएल मधील सामन्यात खेळाची समज असणे ही ड्रेसिंग रुममध्ये केल्या जाणाऱ्या मिमिक्रीपेक्षा खूप कठीण गोष्ट आहे हे मुशीरखान याला आज समजले असेल. त्याच्यानंतर पुन्हा त्याच प्रकारचा फटका खेळताना स्टॉईनीस त्रिफळाचीच झाला ... हे तिन्ही फलंदाज एकच फटका खेळताना, एकाच गोलंदाजाचा, एकाच प्रकारच्या चेंडूवर बाद झाले...हा किती मोठा योगायोग आहे. सुयश याने मधली फळी कापून काढल्यावर पंजाब संघाकडे लढणारे शेलार मामा कोणीही नव्हते. त्यामुळे पंजाब संघाचा बुरुज फक्त 101 धावात कोसळला...

पाठलाग करताना बंगळूर संघ कोसळण्याची शक्यता फारच कमी होती.... कारण सॉल्ट याला लायसन्स टू  किल आपोआपच मिळाले होते ... त्यामुळे त्याने उत्तम आक्रमक फलंदाजी करून पंजाब संघाच्या जखमेवर मीठ चोळले... आणि केवळ 27 चेंडूत 56 धावा ठोकून काढून आज बंगळूर संघ एकतर्फी विजय मिळवून अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश करील हे पाहिले...

जेमिन्सन याने उजव्या यष्टि बाहेर विराट याला चकविले खरे पण सॉल्ट याने त्याचा जास्त परिणाम होऊ न देता शेवटपर्यंत नाबाद राहून हा विजय साकार केला... मिडविकेट पट्ट्यात त्याने पूल च्या फटक्यावर काही खणखणीत षटकार वसूल करून आपण आता अंतिम फेरीसाठी सज्ज आहोत याचे निर्देश आजच देऊन टाकले....
आज बंगळूर संघाची देहबोली वेगळी होती...ती देहबोली त्यांना या स्पर्धेचे विजेतेपद मिळवायचेच आहे हे सांगत होती... अशाच प्रकारची देहबोली 2011 मध्ये भारतीय क्रिकेट संघाची होती...दोन्ही देहबोलीमध्ये एक साम्य होते ....त्यावेळी सुद्धा भारतीय संघाला एका महानायकासाठी तो विश्वचषक जिंकावयाचा होता.... यावेळी सुद्धा बंगळूर संघाला त्यांच्या एका महानायकासाठी ही स्पर्धा जिंकावयाची आहे... तो महानायक नावाप्रमाणेच विराट आहे.

हे ही वाचा :

IPL 2025, PBKS vs RCB Qualifier 1: उद्देश पावलांचा जाणे पुढेच जाणे

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi : मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
ABP Premium

व्हिडीओ

Shivsena And BJP Seat Sharing : युतीचा बोलबाला, कधी ठरणार फॉर्म्युला? Special Report
NCP Alliance : मित्रांनी ठेवलं दूर, काकांशी एकीचा सूर;  कुणाला डोकेदुखी? Special Report
Thackeray Brother Alliance : बिगुल वाजलं तरी ठाकरे बंधूंच्या युतीचं नाही ठरलं? Special Report
Chandrapur Farmer :कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याने विकली किडनी? शेतकऱ्याचा धक्कादायक दावा Special Report
Navneet Rana : पक्ष की पती? नवनीत राणांची कुणाशी सहमती? भाजप राणांना झापणार की जपणार? Special Report

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi : मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
Prithviraj Chavan VIDEO: राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2025 | मंगळवार
Embed widget