Mahayuti Minister : 'अभाव संवादाचा', मुद्दा मतभेदाचा? दादा आणि भाईंच्या कम्युनिकेशन स्किलची फडणवीसांना चिंता Special Report
Mahayuti Minister : 'अभाव संवादाचा', मुद्दा मतभेदाचा? दादा आणि भाईंच्या कम्युनिकेशन स्किलची फडणवीसांना चिंता Special Report
राजकारणात कोणतीच गोष्ट कधी सहज, अचानक घडत नाही, मग ते मोठ्या नेत्यांचं वागणं असो की बोलणं.. त्यात बोलणारी व्यक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असेल तर तुम्ही आपसूक गांभीर्याने ऐकता.. त्यातही ते ज्यांच्याबद्दल बोलतायत ते दोघे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार असतील तर तुमचे कान टवकारले जाणारच. दोन्ही उपमुख्यमंत्री कामाला उजवे पण कम्युनिकेशन कौशल्यात डावे आहेत असा शेरा मुख्यमंत्री फडणवीसांना मारलाय. नेमकं काय घडलं ते पाहुयात.देवेंद्र फडणवीस...एकनाथ शिंदे...आणि अजित पवार...
महायुती सरकारचे शिलेदार...
महायुती सरकार भक्कम आहे...पण त्यांच्यातले वाद आणि रुसवेफुगवे अधूनमधून समोर येत असतात...
आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे सगळ्यांचे कान टवकारलेत...
आपल्या बेधडक स्वभावामुळे प्रसिद्ध असलेले अजितदादा आणि झपाट्यानं काम करणारे शिंदे संवाद ठेवण्यात मात्र चांगले नसल्याचं रोखठोक मत फडणवीसांनी मांडलंय...
समन्वयाबाबत फडणवीसांनी मजाक मजाकमध्ये शेरा मारला असला तरी दादांचे शिलेदार मात्र नाराज झाले..
दादांचे शिलेदार दुखावले गेले असले तरी भाजप आणि शिवसेनेच्या मंत्र्यांनी मात्र हा सगळा प्रकार खुल्या दिलाने स्वीकारला
All Shows


































