Gopichand Padalkar on Rohit Pawar : मला अडवल्यानंतर दोन महिन्यातच त्यांचं सरकार गेलं, पडळकरांची टीका
Gopichand Padalkar on Rohit Pawar : मला अडवल्यानंतर दोन महिन्यातच त्यांचं सरकार गेलं, पडळकरांची टीका
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. दोन वर्षांपूर्वी चौंडी येथे शरद पवारांच्या उपस्थितीत आमदार रोहित पवार यांनी अहिल्यादेवी होळकरांच्या जन्मोत्सवाचा कार्यक्रम आयोजित केला होता, यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गोपीचंद पडळकर यांना चौंडीत येण्यापासून रोखण्यात आलं होतं, यावर त्यांना त्यांचं प्रायचित्त मिळाल असल्याची टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. मला अडवल्यानंतर दोन महिन्यातच त्यांचा सरकार गेलं असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटल आहे.
हिल्यानगरच्या चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवानिमित्त 3 लाख दिव्यांचा आकर्षक दीपोत्सव करण्यात आला आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या संकल्पनेतून हा दीपोत्सव करण्यात आला आहे. या दीपोत्सवाचं उद्घाटन विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या मातोश्रींच्या हस्ते करण्यात आल आहे. यावेळी सभापती राम शिंदे आणि गोपीचंद पडळकर उपस्थित होते. या दीपोत्सामुळ अहिल्यादेवी होळकर यांचा शिल्पसृष्टी परिसर उजळून निघाला होता. या दीपोत्सवने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तसेच अहिल्यादेवी होळकर यांच्यातील त्रिशताब्दी जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचा आयोजन करण्यात आल्याचे गोपीचंद पडळकर यांनी सांगितला आहे.























